Sunday , September 20 2026
Breaking News

विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा : संत मीरा अनगोळ शाळेला सर्वसाधारण विजेतेपद

Spread the love

 

भावना बेर्डे, प्रथमेश हलगेकर वैयक्तिक विजेतेपद

बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत संत मीरा अनगोळ शाळेने 242 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने 211 गुणासह उपविजेतेपद तर
देवेंद्र जीनगौडा स्कूलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, या स्पर्धेतील प्राथमिक गटात जयेश पाटील व मयुरेश पाटील,मुलींच्यात अचल जाधव, तर माध्यमिक गटात मुलींच्यात भावना बेर्डे संत मीरा, प्रथमेश हलगेकर शांतिनिकेतन यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
प्राथमिक मुलांच्या गटात संत मीरा शाळेने विजेतेपद,देवेंद्र जिनगौडा उपविजेतेपद. मुलींच्या गटात देवेंद्र जीनगौडा शाळा विजेतेपद तर संत मीरा अनगोळने उपविजेतेपद पटकाविले. माध्यमिक मुलांच्या गटात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर विजेतेपद, संत मीरा अनगोळ शाळेने उपविजेतेपद, तर मुलींच्या गटात संत मीरा अनगोळने विजेतेपद, तर देवेंद्र जीनगौडा शाळेने उपविजेतेपद पटकाविले. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार. विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, गंगा गाणीकोप्प, प्रेमा मेलीनमनी, सरोजा कटगेरी, अनुराधा पुरी, शामल दड्डीकर, शिवकुमार सुतार, ओंकार गावडे या मान्यवरांचे हस्ते विजेत्या उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील प्रथम व द्वितीय क्रमांक खेळाडूंची आगामी गुलबर्गा येथे होणाऱ्या विद्याभारती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याप्रसंगी श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, स्वाती सावंत, हर्ष रेडेकर, प्रीती भांदुर्गे, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, सोहेल विजापूरे, सृष्टी भोंगाळे, संभवी स्वामी, प्रतीक एच, बसवंत पाटील, सुनिता पाटील, भारती बाळेकुंद्री, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर प्रेमा मेलिनमनी यानी आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *