Sunday , September 20 2026
Breaking News

नाईंग्लजमध्ये सिद्धेश्वर पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन

Spread the love

 

पहिल्याच दिवशी ७० लाखांच्या ठेवी; ग्रामीण सहकार विस्ताराला नवी गती

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, लघुउद्योग व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या जनवाड येथील श्री सिद्धेश्वर को-ऑप. सोसायटी नाईंग्लज येथील तिसऱ्या शाखेचा प्रारंभ शिवप्रसाद देवरु स्वामीजी (अल्लमप्रभू सिद्धसंस्थान मठ, चिंचली) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स्वामी म्हणाले, “संस्थेच्या संचालकांवरील सभासदांचा विश्वास,पारदर्शक कारभार आणि सेवाभावी कार्यामुळे ही संस्था सहकार क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून, गरजूंना तातडीने आर्थिक मदत देण्याचे कार्य संस्था करत असून भविष्यात या संस्थेच्या शंभर शाखा सुरू होतील,” असे आशीर्वचन केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम पाटील यांनी, शेतकरी, लघुउद्योग व्यावसायिक, नोकरदार तसेच गरजू नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक आधार मिळावा, त्यांची पत निर्माण व्हावी आणि अडचणीच्या काळात त्वरित सहाय्य मिळावे या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली. सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाची काटकसर आणि कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक व्यवहार यामुळे संस्था अल्पावधीतच गरुडझेप घेत ग्रामीण भागात शाखांचे जाळे विस्तारत असल्याचे सांगितले.
शाखेला उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ७० लाखांहून अधिक ठेवी प्राप्त झाल्या असून सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम पाटील, उपाध्यक्ष सिद्धगोंडा पाटील, चार्टर्ड अकाउंटंट रितेश घाटगे, बाबासाहेब मगदूम, संजय पाटील, राजू मगदूम, स्वप्नाली पाटील, बाळासाहेब पाटील, रामा पाटील, पूजा मगदूम, मारुती पुजार, सिद्धाप्पा गावडे, चंद्रशेखर काळे, अण्णाप्पा पाटील, महारुद्र दिवटे, संतोष हमिदवाडे, किरण गुरव, अजित पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, राहुल दिवटे, बाळासाहेब पाटील, आशिष हिरीकुडे, चेतन माने, प्रकाश पाटील, सुशांत दिवटे, सौ. संपती दिवटे, डॉ. अनिल कुंभार, मलगोंडा पाटील, प्रधान व्यवस्थापक राजू निचिते, तानाजी खोत, अंकुश खोत यांच्यासह बोरगाववाडी, ढोणेवाडी येथील शाखा संचालक, सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग खोत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *