Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी रोटरी क्लबचा शनिवारी पदग्रहण सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा शनिवारी (ता.१८) सकाळी ११ वाजता होणार आहे. २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी चेतन लगारे, सचिवपदी राजेंद्र सदलगे आणि खजिनदारपदी चिंतामणी वाळवे यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित रो. विजय मांजरेकर, बीजीआय अशोक नाईक, सहाय्यक राज्य प्रांतपाल राजेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत. इनर व्हील क्लब अध्यक्षपदी दिव्या दिवाणी, सेक्रेटरीपदी स्नेहा खेडेकर, कोषाध्यक्षपदी स्मृती परमणे यांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी स्मिता खामकर, आयपीपी आयडब्ल्यूसी कोल्हापूर यांच्या हस्ते हा पदग्रहण सोहळा होणार आहे डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल मध्ये हा कार्यक्रम होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन आशिष कुरबेट्टी,‌ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गजला पठाण यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *