Sunday , September 20 2026
Breaking News

हरीनगरातील मराठी शाळेला प्रोजेक्टर लॅपटॉपसह गणवेशाची देणगी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हरी नगरातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला शिला राहुल वालीशेट्टी यांनी देणगी स्वरूपात प्रोजकटर स्क्रीन व लॅपटॉप देऊन उपकृत केले. जर्मनीत वास्तव्य असलेल्या या दांपत्याने विद्यार्थ्यांना शनिवारचा पी. टी. रंगाचा गणवेश देऊन मुलांना प्रोत्साहित केले. त्यामुळे या दांपत्याचे कौतुक होत आहे.
शिला वालीशेट्टी यांनी, मी या शाळेची विद्यार्थिनी या नात्याने शाळेच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या बाल जीवनातील शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तुम्ही माझ्या सारखे एक अभियंता म्हणून नावलौकिक सर्वसामान्य नागरिकांना मदत करावी. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला देणगी स्वरूपात मदत करावी असे सांगितले. याशिवाय शाळेतील दोन विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. मुख्याध्यापिका ए. जी. बागल यांनी मनोगत व्यक्त केले.
एस. व्ही. तराळ यांनी संगणकाचे महत्त्व सांगितले.

सुनील शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास एसडीएमसी अध्यक्षा सोनाली खवरे, महादेव खवरे, उपाध्यक्ष रजाक सय्यद, मुरगेश खानापूरे, प्रवीण जोंधळे, योगेश घाटगे,सारिका निंगुरे, के. टी. घस्ते यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थितर होते. के. एम. नलवडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *