Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ. एन. डी. पाटील यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी

Spread the love

 

एस. एस. चौगुले; कुर्ली हायस्कूलमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना अभिवादन

निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या “स्वावलंबी शिक्षण” या विचारधारेचा वारसा पुढे नेत डॉ. एन. डी. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी दिशा देत शिक्षणाचा प्रसार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले कार्य हे सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित डॉ. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.
ए. ए. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. एन. डी . पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. टी. एम. यादव यांनी विद्यालयाच्या विकासासाठी डॉ. एन. डी. पाटील यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली. चौगुले यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉ. एन. डी. पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या भूमिकेतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि लोकशाही मूल्ये रुजविण्याचा आग्रह धरल्याचे सांगितले. यावेळी के. ए. नाईक, एस. एस. साळवी, एस. ए. पाटील, एस. एस. देसाई, एम. बी. खिरुगडे, पी. व्ही. कांबळे, एम. एस. वाळके, एस. ए. बारवडे, शिवानी वाळके, एस. एल. कुंभार यांच्यासह विद्यार्थी वा शिक्षक उपस्थित होते. यश ढगे यांनी सूत्रसंचालन केले. शुभदा कोकणे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *