Monday , September 21 2026
Breaking News

शहापूरच्या पंडित नेहरू हायस्कूलमधील 174 विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट व पँटचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने समाजसेविका, रॉयल राज गोल्डन प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका तथा उद्योजिका डॉ. राजश्री तुडयेकर यांनी शहापूर येथील पंडित नेहरू हायस्कूलमधील 174 विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट व पँटचे वाटप केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन, स्वागतगीत, दीपप्रज्वलन आणि फोटोपूजनाने झाली. पाहुण्यांचा परिचय विनायक कंग्राळकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळी होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. मुघळी, प्रवीण तेजम, मंजुनाथ पुजार, शशिकांत कपूर, प्रशांत पवार, गजानन कदम, युवराज पाटील, पवन, प्रदीप सुतार, विजय खवरे तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राजश्री तुडयेकर यांनी शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचे सांगितले. शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतीही व्यक्ती शून्यातूनही मोठे यश मिळवू शकते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टी-शर्ट व पँटचे वितरण करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापनाच्या वतीने डॉ. राजश्री तुडयेकर, राजेश तुडयेकर आणि त्यांच्या टीमचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले, तर सौ. विजया पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *