Monday , December 22 2025
Breaking News

बेळगाव

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग

  बेळगांव : शिवाजी रोड कोनवाळ गल्ली येथे रविवारी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात बेळगांवकरांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. एंजल फाउंडेशन, हिरकणी महिला मंडळ आणि राजा शिवछत्रपती युवक मंडळ या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय आणि विजय ऑर्थो सेंटर या आघाडीच्या वैद्यकीय संस्थांच्या …

Read More »

तनिष्का काळभैरव हिची विजयी घोडदौड सुरूच!

  बेळगाव : ताश्कंद येथील जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (डब्ल्यूटीटी) रौप्य आणि सुवर्ण पदक मिळविल्यानंतर बेळगावच्या तनिष्का काळभैरव हिने स्वीडन आणि नॉर्वेमध्ये रौप्य पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन आत्मविश्वास आणि धारदार कौशल्यांसह भारतात परतताना तनिष्का हिने बेंगलोर येथे झालेल्या दुसऱ्या कर्नाटक राज्य …

Read More »

सक्षम स्पोर्ट्स एरिनाच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स अजिंक्य!

  बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील सक्षम स्पोर्ट्स एरिना या क्रीडा संस्थेतर्फे आयोजित 14 वर्षाखालील बाद पद्धतीच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकावले आहे. सदर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी ज्योती सेंट्रल हायस्कूलचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला विजेत्या सेंट झेवियर संघातर्फे अरकन …

Read More »

प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

  बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत वाघमारे यांची राणी चन्नम्मा विद्यापीठातील कला शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती कर्नाटक राज्य सरकार विद्यापीठ विधायक-2000, परिच्छेद 21(1) च्या नियमानुसार करण्यात येते. डॉ.चंद्रकांत वाघमारे हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मराठी विभागात सेवा बजावत असून विद्यापीठातील अनेक समित्यावर …

Read More »

जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मण्णूरमार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

  बेळगाव : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मण्णूर मार्फत मण्णूर गावातील मराठी प्राथमिक शाळा व कन्नड प्राथमिक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल के कालकुंद्री सर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती फोटोचे …

Read More »

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बेळगाव : महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील नद्यांचा प्रवाह वाढत आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. शनिवारी (२८ जून) जिल्हा आयुक्त कार्यालयाच्या …

Read More »

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये जनजागृती

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये शहापूर पोलीस स्टेशनच्या पीएसआय एस. एन. बसवा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देऊ केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर कॉन्स्टेबल संदीप बागडी यांनी अमली पदार्थ घेतल्यामुळे कोण कोणते दुष्परिणाम …

Read More »

गोव्याहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीची सेवा

  बेळगाव : गोव्याहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष प्रेमानंद गुरव कुटुंबीयातर्फे स्वागत करण्यात आले तसेच भूतरामहट्टी येथील मुक्तिधाम येथे पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी व भाविकांना महाप्रसाद उपलब्ध करून दिला आहे. केरी सत्तरी येथील माऊली वारकरी संप्रदायतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरपर्यंत …

Read More »

महामेळाव्याच्या “त्या” दोन खटल्यात दीपक दळवी यांच्याकडून न्यायालयात अर्ज दाखल

बेळगाव : बेळगावात भरवल्या जाणाऱ्या कर्नाटकी अधिवेशना विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करते, सन 2017 व 2021 ला महामेळावा आयोजित केला म्हणून कर्नाटकी पोलिसांनी समिती नेते व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, या दोन्ही खटल्यांची सुनावणी आज 28 जून रोजी बेळगावच्या जेएमएफफसी चतुर्थ न्यायालयात पार …

Read More »

बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  बेळगाव : शहरातील काकतीवेस येथील बेळगाव जिम ओनर्स आणि मॉर्डन जिमतर्फे मोफत आरोग्य तपासण्याने नेत्र शिबीर तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर रवी पाटील यांचे विजय ऑर्थो ट्रॉमा सेंटर आणि सिद्धार्थ नेत्रालय यांच्यावतीने हे शिबिर पार पडले. यावेळी या शिबिरात रक्तदाब मधुमेह हाडांची ठिसूळ होता नेत्र तपासणी करण्यात …

Read More »