सुळगा (हिं.) : “टाळ वाजे… मृदंग वाजे… वाजे हरीची वीणा”… “माऊली – तुकोबा” निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा”… आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या …
Read More »आमदार आसिफ सेठ यांनी केला शहराचा पाहणी दौरा…
बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहराचा पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार आसिफ सेठ यांनी आज बेळगावातील किल्ला तलाव, अमन नगर, महावीर नगर आणि पंजी बाबा परिसरात भेट देऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी …
Read More »विद्युत तारा शेडवर पडून तीन म्हशी आणि घोड्याचा मृत्यू
बेळगाव : मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून तीन म्हशी आणि एका घोड्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अरळीमट्टी गावात ही घटना घडली. गावातील शंकर समगार यांच्या म्हशी आणि घोडा एका शेडमध्ये बांधलेल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या आणि गुरांवर पडल्या. या प्रकरणात, तीन म्हशी आणि …
Read More »कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग: पुराची भीती
बेळगाव : कृष्णा नदीत १,०८,७२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदी धोक्याच्या पातळीच्या पलीकडे वाहत आहे. यामुळे नदीकाठावरील भागात पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. पश्चिम घाट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात कृष्णा नदी वाहत असल्याने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून कर्नाटकातील कृष्णा, …
Read More »शिक्षणमहर्षी कै. श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या स्मृतिदिनी मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन!
बेळगाव : सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव, येथे करण्यात आले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे तात्कालिन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांचा 22 जूलै हा स्मृतीदिन “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील १८ पूल पाण्याखाली; बेळगाव जिल्हा पुराच्या छायेत..
बेळगाव : पश्चिम घाट आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे, परिणामी, बेळगाव जिल्ह्यातील सात नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यात पूर येण्याचा धोका आहे. कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, हिरण्यकेशी यासह बहुतेक नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत आणि जिल्ह्यातील १८ पूल पाण्याखाली गेले आहेत. आज एकाच दिवसात ८ …
Read More »अंमली पदार्थ सेवन -तस्करी विरोधात जनजागृती रॅली संपन्न
बेळगाव : बेळगाव येथील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि अन्य संघटनांतर्फे 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी आयोजित जनजागृती रॅली उस्फूर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून सदर …
Read More »सार्वजनिक वाचनालयतर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती साजरी
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांची 151 जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अध्यक्ष अनंत लाड आणि कार्यवाह सुनिता मोहिते यांनी राजर्षी …
Read More »रिक्षा भाडे मागितल्याने चालकावर गुंडांचा हल्ला!
बेळगाव : बेळगावच्या समर्थ नगरमध्ये रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार-पाच जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करून पळ काढल्याची घटना घडली आहे. बसस्थानकावरून रिक्षात बसून समर्थ नगरपर्यंत सोडण्यास सांगितलेल्या रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर रिक्षाचे भाडे मागितले. त्यावेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि …
Read More »बेळगाव, खानापूर, कित्तूर तालुक्यातील शाळांना उद्या पुन्हा सुट्टी
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका तसेच कित्तूर तालुका परिसरात होत असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज आणि अंगणवाड्यांना उद्या पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज बुधवारी 25 जून रोजी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या गुरूवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta