Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

आणखी एक काळवीट मृत; 31 वर पोहोचला मृतांचा आकडा

  बेळगाव : भूतरामहट्टी कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात काळवीटांच्या मृत्यूची मालिका सुरूच असून आज सकाळी आणखी एका काळवीटाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृत काळविटांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. प्राणी संग्रहालयात एकूण 38 काळवीट (ब्लॅकबक) होती, मात्र आता केवळ 7 काळवीट जिवंत असून त्यांच्यावर उपचार व विशेष …

Read More »

भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आणखी एका हरणाचा मृत्यू; संख्या ३० वर

  बेळगाव : रविवारी संध्याकाळी भुतरामनहट्टी येथील राणी कित्तुर चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयात एका हरणाचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या ३० झाली. वन परिक्षेत्र अधिकारी पवन कुरनिंग यांच्या मते, स्थानिक पशुवैद्यकीय पथकाने शवविच्छेदन केले आणि अंतिम संस्कार केले. यापूर्वी, गुरुवारी ८, शनिवारी पहाटे २०, शनिवारी रात्री उशिरा एक आणि रविवारी संध्याकाळी …

Read More »

शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात दीपोत्सव!

  पाच हजार पणत्यांनी उजळला मंदिर परिसर बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचा सोहळा पार पडला. सुमारे पाच हजार पणत्या मंदिर परिसरात, आवारातील दगडी पायऱ्यांवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्याने आज (ता. १६) अख्खा परिसर प्रकाशाने उजळून निघाला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात …

Read More »

सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमतर्फे मदत

  बेळगाव : टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन निवड प्रक्रियेसाठी देशभरातून बेळगावात दाखल झालेल्या 600 पेक्षा अधिक तरुण उमेदवारांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमतर्फे पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सीपीईड ग्राऊंड आणि शौर्य सर्कल परिसरात अनेक उमेदवार फुटपाथवर व मोकळ्या जागेत थांबून निवड प्रक्रियेसाठी तयारी करत असल्याचे टीमच्या सदस्यांच्या निदर्शनास …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे बेळगावात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा

  बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे सर्किट हाऊस, बेळगाव येथे कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन हा मेळावा विशेषतः आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना बेळगावच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे युवासेना बेळगाव या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या वर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवराय व बाळासाहेब यांचे पूजन करून शिबिराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी तमाम मराठी भाषिक, युवक, शिवसैनिक यांनी उपस्थित राहून व …

Read More »

१३ जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : म्हैसूर येथे ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब व अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी अभूतपूर्व यश मिळवत ९ सुवर्ण, १४ रौप्य व १९ कांस्य असे ४२ पदके जिंकली. या चमकदार कामगिरीच्या बळावर १३ जलतरणपटूंची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

आमदार आसिफ सेठ यांचा मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दौऱ्यात सहभाग

  बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ अधिकृत प्रतिनिधीमंडळासह नवी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री बी. झेड. झमीर अहमद खान यांच्यासोबत त्यांनी कर्नाटकातील विकास प्रकल्प, प्रशासकीय समन्वय आणि कल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीत मंजूर प्रकल्पांना निधी व प्रशासकीय मंजुरी, विभागीय अंमलबजावणीतील …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या ‘ज्योतिर्मयी’ मॅगझिनचे प्रकाशन उत्साहात

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे आज शाळेच्या पहिल्या ‘ज्योतिर्मयी’ नामक शालेय मॅगझिनच्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यिक विचारांना व्यासपीठ देण्यासाठी हे नियतकालिक सुरू करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि …

Read More »

कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाचा दीपोत्सव उत्साहात

  बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने गल्लीतील श्री वेताळ देवस्थान व श्री बसवाना देवस्थान येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीस अदिती पवार, प्रीती पाटील, मेघना पाटील यांनी मंदिरांसमोर सुंदर रांगोळी रेखाटली. कुमारी ज्योती सुतार हिने दीपोत्सवाबद्दलची माहिती सांगितली. दिव्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा …

Read More »