बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेतर्फे आयोजित कराटे बेल्ट परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट पटकावला. शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी तहसीलदार गल्ली येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या कार्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ७५ कराटेपटूंनी विविध कलर बेल्टसाठी सहभाग घेतला. त्यामधून वर्धन चौगुले, …
Read More »शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचा प्रोत्साह फाउंडेशनकडून सन्मान
बेळगाव : शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचा प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी आनंदनगर, वडगाव येथे प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजातील गुणवंत …
Read More »तातडीच्या दुरुस्ती कामासाठी उद्या शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : ३३ केव्ही जीआयएस श्रीनगर येथे तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या नियोजित वीजपुरवठा खंडितमध्ये श्रीनगर, अंजनेय नगर, महांतेश नगर, शिवाजीनगर, …
Read More »कच्ची दारू विक्रीप्रकरणी एकाला अटक; २० लिटर कच्ची दारू जप्त
बेळगाव : मच्छे गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कच्ची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २० लिटर कच्ची दारू जप्त केली. परशुराम बसाप्पा नाईक (३५, रा. वाल्मिकी नगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ सप्टेंबर रोजी तो …
Read More »गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक; १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : शहरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अक्षयकुमार सोमशेखर अंकलगी (२०, रा. गुरुवार पेठ, कित्तूर), आदर्श ईरय्या हिरेमठ (२५, रा. सोमवार पेठ, कित्तूर) …
Read More »बस तिकीट दरवाढीचे संकेत; प्रवाशांवर भार पडणार नाही
बेळगाव : केंद्र सरकारकडून गेल्या आठ महिन्यांत इंधनाच्या किमतीत वाढ करण्यात आली असतानाही राज्यातील बस तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे केएसआरटीसीसह राज्यातील चारही परिवहन निगमला हजारो कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बस तिकीट दरवाढीचा विचार सुरू असून, प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ तास पाणी नळजोडणीला ‘ब्रेक’
खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी कंत्राटदारांची लगबग; उत्सवानंतर पुन्हा कामाला सुरुवात बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या नऊ-दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळजोडणीच्या कामाला तात्पुरता ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. एल अँड टी कंपनीकडे नळजोडणीचे कंत्राट असून विविध भागांत नळजोडणीचे काम सुरू होते. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »संजीवनी काळजी केंद्रात जन्माष्टमीचा भक्तिमय जल्लोष
जन्माष्टमीदिनी जन्मलेल्या गोपाळकृष्ण शानभाग यांचा शताब्दी वाढदिवस उत्साहात बेळगाव : संजीवनी फाउंडेशनच्या काळजी केंद्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांना विविध पारंपरिक वेशभूषेत सजविण्यात आले होते. राधा-कृष्णाची जोडी, बालकृष्ण तसेच अन्य आकर्षक वेशभूषांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या सोहळ्याचे …
Read More »बेळगावच्या मराठा एलआयआरसीमध्ये भक्तिमय वातावरणात जन्माष्टमी उत्सव
बेळगाव : गोकुळाष्टमीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होत असताना, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (मराठा एलआयआरसी) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह, श्रद्धा आणि लष्करी परंपरेच्या दिमाखात साजरी करण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी मिलिटरी महादेव मंदिरात विशेष पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी पार पडले. या कार्यक्रमाला मराठा एलआयआरसीचे कमांडंट …
Read More »कवितांच्या सरींनी रंगले कवी संमेलन
राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने संयुक्त उपक्रम बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच कवी व साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta