Sunday , July 26 2026
Breaking News

डी.वाय.सी. भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटीलला जुडो स्पर्धेत रौप्य पदक

Spread the love

 

बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेशची विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 70+ वजन गटात 22 ते 28 जानेवारी 2026 दरम्यान मणिपूर येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. तिने या स्पर्धेत सातत्यपूर्ण वर्चस्व दाखवून पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान व मणिपूर येथील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून अंतिम स्पर्धेत प्रवेश केला.
अंजली मूळची ही मत्तीवडे तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील श्री. उमेश पाटील या शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे.
अंजलीच्या यशाचे अभिनंदन भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विनोद दोड्डननावर तसेच व्यवस्थापक मंडळ यांनी भविष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले सर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. एम. बी. बखेडी सर तसेच क्रीडाशिक्षक पी.वाय.कामलयांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.
कुमारी अंजली पाटील हिला डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगाव मधील एनआयएस प्रशिक्षक रोहिणी पाटील मॅडम तसेच खूतुजा मुलतानी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *