बेळगाव : साधना क्रीडा संघातर्फे बेळगामध्ये प्रथमच विश्वचषकाच्या धर्तीवर राज्यस्तरीय निमंत्रितांच्या मॅटवरील फ्लडलाईट खो-खो स्पर्धेचे आयोजन १८ व २० एप्रिल रोजी वडगावमधील कन्नड मुलांची शाळा नं. १४ (जैल शाळा) येथे आज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. साधना क्रीडा संघ ही संघटना १९६८ पासून खोखो क्षेत्रात …
Read More »कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धा उत्साहात
बेळगाव : नेहरूनगर, बेळगाव येथील डीवायईएस ज्युडो इनडोअर हॉल येथे आयोजित कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. डीवायईएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि भैरवी मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत. पुरुष विभाग …
Read More »कौशल्याधारित शिक्षणाद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे : कुलगुरू प्रो. सी. एम. त्यागराज
शिवानंद महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन कागवाड : विकसित भारत @ २०४७ साध्य करण्यासाठी ऐतिहासिक आणि आर्थिक प्रयत्न परंतु ग्रामीण स्तरावर शिक्षण घेतलेल्या आणि शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देणे हे आपल्या अध्यापन अभ्यासक्रमाचे मोठे ध्येय आहे. कौशल्याधारित शिक्षणाद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण सुरूच राहिले …
Read More »बेळगाव डीसीसी बँकेला 33 कोटी 11 लाख रुपयांचा नफा
बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकने या वर्षी एकूण 33 कोटी 11 लाख रुपयांचा नफा मिळवला असून, बँकेच्या कार्यकाळात विविध योजनांचा फायदाही प्राप्त झाला आहे, अशी माहिती बँकेचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. आज बोलाविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदर माहिती देण्यात आली. बेळगाव डीसीसी बँकेने या 5 महिन्यांच्या कार्यकाळात …
Read More »कलामंदिरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 20 एप्रिल रोजी उद्घाटन
बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बहुमजली कलामंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन 20 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, तसेच …
Read More »श्री देवदादा सासनकाठी बेळगावात दाखल; महाप्रसादाचे वाटप
बेळगाव : सालाबादप्रमाणे परंपरेनुसार कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची यात्रा आटोपून जोतिबाच्या नावानं चांगभलं, काळभैरवाच्या नावानं चांगभलं अशा जयघोषात चव्हाट गल्ली येथील श्री देवदादा सासनकाठी आज गुरुवारी पुनश्च बेळगावमध्ये दाखल झाली. त्यानिमित्त शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. आगमन होताच प्रथेनुसार चैत्र …
Read More »महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. त्यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच …
Read More »सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानात अतिक्रमण हटाव कारवाईला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
सौंदत्ती : सौंदत्ती येथील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लम्मा देवी देवस्थान परिसरातील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईला स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, प्राधिकरणाच्या आयुक्तांना मंदिरातच अडवण्यात आले. सौंदत्ती तालुक्यातील श्री रेणुका यल्लम्मा देवी देवस्थानाच्या आवारातील अनधिकृत गाळ्यांवर आज अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई श्री …
Read More »सौंदत्तीमध्ये बेकायदेशीर खाणकाम करताना दगड कोसळून एकाचा मृत्यू
सौंदतत्ती : काल रात्री सौंदत्ती तालुक्यातील यड्रावी येथे बेकायदेशीर उत्खनन करताना दगड कोसळून एकाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सौंदत्ती तालुक्यातील यड्रावी येथे बेकायदेशीर उत्खनन करताना एका मोठ्या दगडाखाली अडकून अर्जुन चुलके (५२) यांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाले असून टेकडी …
Read More »अथणी येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीची आत्महत्या; एक ताब्यात
बेळगाव : अथणी तालुक्यातील कोडगनूर गावात आई-मुलाच्या हत्येप्रकरणी अथणी पोलिसांनी खुनाच्या संशयिताला अटक केली असून, आणखी एका संशयिताने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (६२) आणि विठ्ठल अप्पाराय इचेरी (४२) यांची गेल्या रविवारी निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह उसाच्या मळ्यात फेकल्याचा तपास करणाऱ्या अथणी पोलिसांना आरोपींची ओळख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta