Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

जायन्ट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे नाना चुडासमा जी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम….

  बेळगाव : जायन्ट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे संस्थापक, स्वर्गीय श्री. नाना चुडासमा जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्थानिक १९ नंबर शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या, केक आणि अल्पोपहार वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात आला आणि नाना चुडासमा यांची आठवण साजरी करण्यात आली. …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते मोहन कुंभार यांच्याकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला देणगी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी शाळेचे माजी पालक, अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचे संचालक श्री. मोहन नारायण कुंभार यांनी एक लाख दोन हजार रुपयांची भरघोस देणगी दिली. श्री. मोहन कुंभार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांची दोन्ही मुले मराठी विद्यानिकेतन शाळेत शिकलेली आहेत. त्यांचे स्वतःचे वर्कशॉप आहे. मराठी …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये वन महोत्सव व स्वच्छतागृहाचे उद्घाटन

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आज वन महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुलींच्या स्वच्छतागृहाचे ही उद्घाटन करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राम भंडारे व सौ. प्रीती भंडारे यांच्या हस्ते मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन व वन महोत्सव साजरा करण्यात आला. श्री राम भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …

Read More »

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू!

  बेळगाव : महाराष्ट्रातील पुणे जवळील इंद्रायणी नदीचे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावातील युवक चेतन चावरे (२२) यांचा रविवारी पुण्याजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Read More »

“ऑल इज वेल” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज….

  मुंबई ; ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ …

Read More »

हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे बसवन कुडचीत म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  बेळगाव : ट्रान्सफॉर्मरजवळ विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बसवन कुडची (ता. बेळगाव) येथे घडली आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. सदर म्हैस जिन्नप्पा वंडरोटी (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची) यांच्या मालकीची होती. जिनाप्पा वंडरोटी यांच्याकडे एकूण सहा म्हशी असून, दररोजच्या सवयीप्रमाणे …

Read More »

नंदिहळ्ळी येथील मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी गावातील जागृत देवस्थान कलमेश्वर (शिव) मंदिर अत्यंत जुने मंदिर आहे .त्या मंदिराचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. तेव्हा धर्मादाय खात्यातून या मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करावा यासाठी नंदिहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवार दि. 16 रोजी निवेदन देण्यात …

Read More »

बंगळूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणास राज्य सरकारच जबाबदार; भाजपचा गंभीर आरोप

    बेळगाव : बंगळूरमधील आरसीबी संघांच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांचा बळी गेलेल्या घटनेला राज्य काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत आज बेळगावात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात हातात फलक घेऊन आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतर्फे शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन….

  बेळगाव :  विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने शाळेतील एस एस एल सी 2025 वर्षात उत्तम गुण संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा शिष्यवृत्तीचे वितरण तसेच विविध मान्यवरांच्या व शिक्षकांच्या कडून प्रोत्साहन पर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक 14 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख …

Read More »

हरीनामाच्या गजरात वडगावचे वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ…

  बेळगाव : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज रविवारी वडगाव राजवाडा कंपाउंड श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो हरीभक्त पंढरपूर मार्गे आळंदीला वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. आषाढी वारीत आतापर्यंत …

Read More »