अथणी : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात ग्रामपंचायत पीडीओचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अनंतपूर गावातून तांवशी मार्गावर जात असताना झालेल्या अपघातात नागनूर पा. गावातील अशोक सनदी (48) यांचा मृत्यू झाला. गेल्या 20 वर्षांपासून ते विविध ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत होते आणि आजारपणामुळे गेल्या 6 महिन्यांपासून …
Read More »बीम्स हॉस्पिटलला लोकायुक्तांची अचानक भेट
बेळगाव : बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान बीम्समधील समस्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आणि सरकारच्या निर्देशानुसार इतर समस्यांची पाहणी केली. यावेळी लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली २० हून अधिक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या दालनात …
Read More »महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या आरोपीला अटक
बेळगाव : एकट्या महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दरोडेखोराला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २७ जानेवारी रोजी राणी चन्नम्मा नगर, बेळगाव येथील दुसऱ्या चौकात एका दरोडेखोराने एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ३ लाख ५० हजार किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. …
Read More »भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना त्यांच्या हक्कांची पूर्तता मिळावी, यासाठी भाषिक अल्पसंख्याक आयोगाने महत्त्वाची दखल घेतली आहे. नुकत्याच झालेल्या बेळगाव दौऱ्यात भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी विविध समस्यांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांना मातृभाषेत सरकारी परिपत्रके मिळत नाहीत, तसेच अल्पसंख्याक प्रमाणपत्रे देण्यात होत …
Read More »बामणवाडी येथील गावठाण जमीन बळकावल्याप्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार
बेळगाव : किणये ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील बामणवाडी गावच्या 5 एकर सरकारी खुल्या गावठाण जमिनीपैकी 3 एकर जमीन कल्लाप्पा बाळाप्पा चिगरे यांनी बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. तरी याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशीसह कार्यवाही करून सदर जमीन गावाच्याच नावे राहील अशी व्यवस्था करावी आणि आम्हा गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बामणवाडी …
Read More »आत्महत्या नसून हत्या; येळ्ळूर येथील कुंडेकर कुटुंबियांचा आरोप!
बेळगाव : शहापूर नाथ पै सर्कल येथे काल एका तरुणाने प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केल्याच्या घटनेसंदर्भात आज तरुणाच्या कुटुंबीयांनी शवागारासमोर आंदोलन केले. आमच्या तरुणाने आत्महत्या केलेली नाही. त्याची हत्या केल्याचा आरोप येळ्ळूर येथील कुंडेकर कुटुंबियानी केला आहे. शहापूर नाथ पै सर्कलमध्ये काल संध्याकाळी नवी गल्ली येथील ऐश्वर्या महेश लोहार …
Read More »नवहिंद क्रीडा केंद्राच्या अध्यक्षपदी नारायण गोरे तर सेक्रेटरीपदी आनंद पाटील
येळ्ळूर : क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवहिंद क्रीडा केंद्राच्या केंद्राचे संस्थापक सदस्य श्री. नारायण गोरे यांची अध्यक्षपदी तर सेक्रेटरीपदी श्री. आनंद पाटील यांची निवड नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर होते. प्रारंभी सेक्रेटरी श्री. आनंद पाटील यांनी स्वागत …
Read More »कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात
बेळगाव : कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मदन बामणे, मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजी अतिवाडकर, कार्याध्यक्ष श्री. मधु बेळगावकर, तालुका विविध कार्यकारी संघाचे सल्लागार व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रकाश बेळगुंदकर, शाळेचे …
Read More »महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास ठेवून धरणे आंदोलन स्थगित
बेळगाव : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीमावासियांच्यावतीने आंदोलनादरम्यान धरणे आंदोलन छेडले जाईल. मात्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेतली आणि सीमावासियांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमावासियांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत सीमावासियांना आंदोलनाची वेळ येऊ …
Read More »दिव्यांग संघाकडून जमीन विक्रीचा प्रकार; संघाच्या माजी सदस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : वृद्धाश्रम उभारण्यासाठी खरेदी केलेली जमीन प्लॉटमध्ये रूपांतरित करून विक्री केली जात असल्याचा आरोप बेळगाव दिव्यांग संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकाराला दिव्यांग संघाच्या माजी सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगाव दिव्यांग संघाच्या वतीने वृद्धाश्रम उभारण्यासाठी विशेषतः जमीन खरेदी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta