बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १५/२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत मराठी भाषा गौरव दिन, सामान्यज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन आणि इतर विषयावर निर्णय घेण्यात येणार आहेत …
Read More »नाट्यदिंडीच्या रूपात रसिकांना सहा नाटकाची मेजवानी
बेळगाव : बेळगाव शहर हे कलारसिकांचे शहर आहे. या शहराला नाट्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये मराठी नाटकांच्या समोरील पेचप्रसंग अधिक जटिल होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आता बेळगावचे मराठी नाट्य वैभव सुरक्षित ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा पुढे सरसावली आहे. नाट्यदिंडी या उपक्रमाच्या …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूरच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
बेळगाव : देशाचं नेतृत्व क्रीडा मैदानावर तयार होत असते त्यासाठी प्रत्येकाने क्रीडा मैदानावर परिश्रम घेतले पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये नैसर्गिक क्रीडा गुण उपजत असतात त्याचा विकास करणे महत्त्वाचे असते. बक्षीसे पदके मिळवण्यापेक्षा स्वतःला सदृढ ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. क्रीडा सरावाबरोबरच योगा अंगीकृत करा असे …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पदवीत्तर शिकवण्यात यावा : साहित्यिक अर्जुन जाधव यांची मागणी
मुंबई : अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याचा संपूर्ण इतिहास माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी ते पदवीत्तर अभ्यासक्रमात शिकवण्यासाठी समाविष्ट करण्यात यावा.अशी मागणी साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा, धाडसीपणाचा, शासन व प्रशासन …
Read More »बेळगावात ताल ऋषी पंडित आनिंदो चटर्जी यांच्या ‘तपस्या’ पुस्तकाचे अनावरण
बेळगाव : डॉ. प्रकाश रायकर फाउंडेशन यांच्यावतीने बेळगावात ताल ऋषी पंडित आनिंदो चटर्जी यांच्या ‘तपस्या’ पुस्तकाचे अनावरण तसेच श्री. विशाल मोडक यांचा “गंडा बंधन” सोहळा. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी 5 वाजता गोगटे कॉलेजच्या के के वेणूगोपाल सभागृहात हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला खूप मोठे मान्यवर मोठे …
Read More »बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी येळ्ळूरच्या सौ. राजकुंवर पावले यांची निवड
येळ्ळूर : येळ्ळूर गावांमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असणाऱ्या, तसेच गरीब, दिनदलितांच्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या व येळ्ळूर विभाग भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड पक्षातील वरिष्ठ, कोर कमिटी सदस्य, बेळगाव जिल्हा महानगर …
Read More »बोडकेनट्टीत १६ रोजी गिरणी कामगारांची बैठक
बेळगाव : एकेकाळी मुंबईचा मुख्य व्यवसाय म्हणजे कापड गिरण्या मुंबईत मोठ्या प्रमाणात गिरण्या चालत होत्या जवळपास पाच पिढ्यानी गिरणीत काम केले आणी याच गिरण्यात आपल्या सीमाभागातील म्हणजे बेळगावच्या कामगाराची संख्या सुध्दा मोठी होती. मुळात गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासात मोठे योगदान दिले त्यामुळे मुंबई एक आधुनिक विकसित शहर झाले महाराष्ट्र …
Read More »श्री रेणुका यल्लम्मा डोंगरावर भाविकांसाठी पुरेपूर व्यवस्था : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
तिरुपती, धर्मस्थळ धर्तीवर विकासाची योजना बेळगाव : सौंदत्ती येथील श्री क्षेत्र रेणुका यल्लम्मा देवीच्या उत्सवात भरत पौर्णिमेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. एका दिवसात सुमारे लाखो भाविक मंदिराला भेट देत आहेत. भाविकांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेऊन पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश आणि …
Read More »मुलांमध्ये सुसंस्कार घडविण्यासाठी पालकांना साने गुरुजींच्या “शामच्या आईची” भूमिका निभवावी लागेल : सौ. सुजाता छत्रू पाटील
रणझुझांर शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न बेळगाव : विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे अनुष्ठान होणे गरजेचे आहे. त्याकरिता पालकांनी आपल्या पाल्यांचे अति लाड पुरवण्यापेक्षा त्यांच्या लहानात लहान चुकीकडे लक्ष घालने व त्यांना चुकांपासून परावृत्त करण्यासाठी पालकांनी श्यामची आई होणे ही आजच्या …
Read More »मॉडेल शाळा येळ्ळूर येथे केंद्र पातळीवरील शिक्षण महोत्सव (कलिका हब्ब) उत्साहात पार
येळ्ळूर : इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांच्या मजबुतीसाठी शिक्षण महोत्सव (कलिका हब्ब) सर्व सरकारी शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यास मदत करतो. विशेष करून जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागासलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव शिक्षणामध्ये आवड निर्माण करण्यास महत्त्वाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta