बेळगांव : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना दिनांक नऊ फेब्रुवारी 2025 रोजी विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन …
Read More »खाऊ कट्टा प्रकरणाने दोन नगरसेवकांचे पदचं खाल्ले!
बेळगाव : बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा भ्रष्टाचार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांना दोषी मानून दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्तांनी बजावला आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लवकरच होत असताना, आज करण्यात आलेली दोन नगरसेवकांच्या विरोधातील कारवाई बेळगावच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात …
Read More »करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जा : ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा
बेळगाव : जगात करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. मात्र आम्ही मोजक्याच क्षेत्रात गुरफटलो आहोत. करिअर निवडताना आत्मविश्वासाने सामोर जावे. ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे कॉलेजमधूनच मिळायला हवेत असे मत ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी व्यक्त केले. विश्वभारत सेवा समितीच्या पंडीत नेहरु पीयु कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने ते …
Read More »विधिज्ज्ञ हरिष साळवे मांडणार सीमाप्रश्नी बाजू; महाराष्ट्र सरकारकडून पाठपुरावा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आंदोलन करताच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सीमाप्रश्नाच्या दाव्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे सीमावासीयांची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दाव्याला बळकटी आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून खटला प्रलंबित आहे. या दाव्यात विधिज्ज्ञ …
Read More »अपघातातील मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
बेळगाव : बेळगावहून कुंभमेळ्यासाठी निघताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील चार जणांचे मृतदेह आज बेळगावात पोहचले. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात पोहोचलेले पार्थिव बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि मृतांच्या कुटुंबियांनी स्वीकारले. बेळगावहून सुमारे १८ जण कुंभमेळ्यासाठी रवाना झाले होते. ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात कॅन्टर, टीटी आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात …
Read More »मराठी विद्यानिकेतनतर्फे प्रा. सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पि.यू. कॉलेज येथील मराठी विषयाचे प्राध्यापक श्री सुरेश पाटील हे 31 जानेवारी रोजी आपल्या 35 वर्षाच्या प्राध्यापकी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे त्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे …
Read More »स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या वतीने आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन मराठी विद्यानिकेतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश पाटील सर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक श्री. इंद्रजीत मोरे …
Read More »पोर्णिमे पुर्वीच श्री रेणुका देवी यात्रेसाठी यल्लमा डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी
सौंदती : सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची भरत पोर्णिमा यात्रा बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. दरम्यान यात्रेपूर्वीच चार दिवस अगोदर यल्लामा डोंगर डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पौर्णिमा यात्रेपूर्वीच लाखो भाविक भरत पौर्णिमा यात्रेसाठी यांना डोंगरावर …
Read More »बाग परिवाराचा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार
बेळगाव : बाग परिवाराचा फेब्रुवारी महिन्यातील कार्यक्रम शनिवार दि. 8 रोजी किर्लोस्कर रोडवर येथील जत्तीमठामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने पार पडला. जवळजवळ वीस कवींनी आपल्या कविता बहारदारपणे सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सुरूवातीस अक्षता येळूरकरने “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा” हे भक्ती गीत गायिले. वेगवेगळ्या विषयावरील …
Read More »अपघातातील मृत भाविकांचे शव उद्या बेळगावात
बेळगाव : महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून भाविक बेळगावला परतताना ट्रॅव्हलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरने प्रथम एका दुचाकीला ठोकरून त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावातील 4 भाविकांचा मृत्यू झाला. त्यांचे शव उद्या रविवारी सकाळी बेळगावात दाखल होणार आहेत या अपघातात मृत झालेले सागर परसराम शहापूरकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta