Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

अन्नोत्सवाचे शेवटचे दोन दिवस

  बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने अंगडी कॉलेज समोर सुरू असलेल्या अन्नोत्सव या उपक्रमात आजवर हजारो खवय्याने भेट देऊन विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. या अन्नोत्सवाचा मंगळवार दि. १४ रोजी समारोप होत आहे. १० जानेवारी रोजी, प्रतिभावान बेलगम सागर यांच्या भावपूर्ण सूफी रात्रीचा आनंद उपस्थिताना मिळाला. या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध …

Read More »

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी

  बेळगाव : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान उर्फ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता जिजाबाई जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान उर्फ ​​जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व सर्व पदाधिकाऱ्यांनी जिजाबाई जयंती साजरी केली. जिजाऊ ब्रिगेड महिला गटांना एकत्र करून त्यांना व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण देऊन स्वतंत्र …

Read More »

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न पुस्तकाचे आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते झाले प्रकाशन

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांनी संकलन केलेल्या “संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले. या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र तासगाव कवठेमंहाकाळचे आमदार रोहित आर. आर. पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, चळवळ टिकली पाहिजे चळवळ टिकवण्यासाठी युवा समितीने पुस्तकाच्या रूपाने …

Read More »

खानापूर तालुका समिती शिष्टमंडळाने घेतली आमदार श्री. रोहित पाटील यांची सदिच्छा भेट

    बेळगाव : रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्यामध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे दिवंगत नेते कै. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार श्री रोहित पाटील यांची भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. नामदार कै. …

Read More »

बसवेश्वर बँक अध्यक्षपदी रमेश कळसन्नाकर तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील

  बेळगाव : येथील प्रसिद्ध बेळगावी श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी माजी चेअरमन श्री. रमेश महारुद्रप्पा कळसन्नावर आणि उपाध्यक्षपदी नूतन संचालक सतीश कलगौडा पाटील यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी जबिउल्लाह के. यांच्या उपस्थितीत शनिवारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड झाली. सहकारी खात्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री. समीर …

Read More »

मच्छे येथे स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी

    बेळगाव : मच्छे येथील जिजामाता चौक येथे गावातील सर्व नागरिकांतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन श्री बाल शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष संभाजी कणबरकर यांनी केले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते राजू नावगेकर यांनी केले. यावेळी डॉक्टर पद्मराज पाटील, विनायक …

Read More »

तालुका म. ए. समिती एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे आज युवा मेळावा!

  बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे आज (ता. १२) होणाऱ्या युवा मेळाव्यासाठी चलो मराठा सांस्कृतिक भवनचा नारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत मेळाव्याच्या ठिकाणी आवश्यक ती तयारी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त युवा आघाडीतर्फे शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन …

Read More »

श्री ब्रह्मलिंग प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघ नियमित निलजी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध

  बेळगाव : श्री ब्रह्मलिंग प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघ नियमित निलजी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध ठरली. अध्यक्ष म्हणून श्री. मल्लाप्पा गोविंद गाडेकर तर उपाध्यक्षपदी सौ. सुशीला भाऊसाहेब मोदगेकर यांची फेरनिवड झाली आहे. श्री ब्रह्मलिंग पीकेपीएसने यंदाच्या निवडणुकीत देखील आपली बिनविरोधाची प्रथा कायम ठेवली असून खेळीमेळीच्या झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष आणि …

Read More »

दुसऱ्या मजल्यावरून पडून युवकाचा मृत्यू; दुसरा भाऊ जखमी

  बेळगाव : नशेत दोन भावांमध्ये वादावादी होऊन दोघेही दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असून ही घटना बेळगाव तालुक्यातील निलजी येथे शुक्रवारी (ता. १०) रात्री उशिरा घडली. सुशांत सुभाष पाटील (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मोठा भाऊ ओंकार (२३) जखमी …

Read More »

श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा 13 जानेवारीपासून बेळगावात

    बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून 13 जानेवारी रोजी रात्री बेळगावात येत आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे राहणार असून 14 जानेवारीला दत्त मंदिर वडगाव येथील परिक्रमेनंतर …

Read More »