सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तारांगण व फॅशनच्या दुनियेतील नावलौकिक फॅशन ट्रेंड्स या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कार हा फॅशन शो व व महिलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रविवार दिनांक २ जून दुपारी २ ते ७ यावेळेत खानापूर रोडवरील महावीर भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला …
Read More »चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळेचे आवार गजबजले!
बेळगाव : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ वाटप करून आकर्षक पद्धतीने शाळा सजवून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला. …
Read More »जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल जनजागृती
बेळगाव : जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाम परिवारातर्फे आज 31मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल देशमुख रोड टिळकवाडी येथील चव्हाण डेअरी येथे कार्यक्रम करण्यात आला आणि शहरात जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी फेडरेशनचे अध्यक्ष राजू माळवदे यांनी केले. उपाध्यक्ष सचिन केळवेकर यांनी तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या आजाराची आणि त्यानंतर …
Read More »दिग्गु-बाळूची यारी खड्ड्यात गेली दुनियादारी….
शहरातील बहुचर्चित अशा “त्या” बँकेच्या अध्यक्षाचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची यादी संपता संपत नाही. “बेळगाव वार्ता”ने सातत्याने “त्या” बँकेचे गैरव्यवहार उघड केले असले तरी एक म्हण आहे “निर्लज्जम सदासुखी” या म्हणीला न्याय देण्याचे काम बँकेचा अध्यक्ष दिग्गुभाई आणि त्याचा पार्टनर बाळू यांनी केले आहे. “बेळगाव वार्ता”च्या हाती आलेल्या माहितीनुसार “त्या” …
Read More »येळ्ळूर शिवसेना चौक येथील कोसळलेल्या गटारीकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष…
बेळगाव : 5 महिन्यात 3 वेळा निवेदन देऊन सुद्धा केवळ आश्वासन ऐकायला मिळतं आहेत. त्यामुळे येळ्ळूर येथील नागरिकांतून तीव्र संताप दिसून येत आहे. शिवसेना चौक मेन रोडची गटार फार जुनी असून ती कोसळलेली आहे. ग्राम पंचायतीला ती गटार स्वच्छ करून पूर्ण बांधून द्यावी अशी मागणी करून 3 वेळा निवेदन …
Read More »सागर बी.एड्. महाविद्यालयाचे नागरिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात
काटगाळी व देसूर गावात विविध उपक्रम बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने काटगाळी व देसूर गावात तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय कुलकर्णी व किरण मठपती उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हळब होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशिक्षणार्थींच्या प्रार्थना व स्वागतगीताने …
Read More »समाज सुधारक विश्वासराव धुराजी यांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा
बेळगाव : चव्हाट गल्ली बेळगाव येथील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, समाज सुधारक श्री. विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांच्या वतीने विश्वासराव धुराजी यांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …
Read More »हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा; शहर समितीच्यावतीने आवाहन
बेळगाव : १ जून १९८६ दिवशी बेळगाव येथे झालेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात शनिवार १ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रद्धांजली कार्यक्रम तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी …
Read More »मातृभाषेतून शिक्षणामुळे विचारांचा पाया मजबूत होतो
साठे प्रबोधनी व्याख्यानमालेत प्रतापसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील व्याख्यान व गुणगौरव समारंभाचे आयोजन मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, प्रमुख वक्ते प्रतापसिंह चव्हाण, …
Read More »अर्जुन जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण..” साहित्यकृतीला राज्यस्तरीय पुरस्कार
बेळगाव : बेळगावचे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव लिखित “प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला पलपब पब्लिकेशन संस्था, अहमदाबाद (गुजरात) या संस्थेचा “पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार 2024” हा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद (गुजरात) ही संस्था गुजरात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta