Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर शिक्षणाधिकारी कार्यालय व मराठी विद्यानिकेतन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश पाटील सर यांनी केले. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या दुसऱ्या सत्रात बी. बी. शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात दत्ता पाटील सर यांनी योगाचे प्रात्यक्षिके दाखविली. चौथ्या सत्रात नीला आपटे यांनी मुलांना प्रेरणादायी व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात कॅन्टोन्मेंट शाळेचे आर. पी. कदम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले. सदर कार्यक्रमाला मराठी विद्यानिकेतन, महिला विद्यालय, कॅन्टोन्मेंट हायस्कूल, एस.एस.आर.डी हायस्कूल येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *