Monday , September 21 2026
Breaking News

अभिनेता दर्शनला तुरुंगात शाही वागणूक दिल्याप्रकरणी कारागृहातील ७ अधिकारी निलंबित; गृहराज्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर

Spread the love

 

बंगळुरू : अभिनेता दर्शनला तुरुंगात शाही वागणूक दिल्याप्रकरणी परप्पण कारागृहातील ७ अधिकाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री डॉ.जी. परमेश्वर यांनी सांगितले.

बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, हत्येचा आरोप असलेल्या दर्शनला तुरुंगात शाही वागणूक दिली जात आहे. याबाबत चौकशी करून अहवाल देण्याची सूचना मी केली आहे. तसेच याआधी ७ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परप्पण कारागृहात दर्शनासाठी अशी व्यवस्था कोण करत आहे? त्याला अशा गोष्टी कशा उपलब्ध करून देता येतील? कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तपासाची सूचनाही केली आहे, असे ते म्हणाले.

जेलर शरणबसव अमिनगड, सहाय्यक जेलर पुट्टास्वामी, हेड वॉर्डर वेंकाप्पा, संपत आणि ७ तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *