Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्याच्या वारसाला मदतीची गरज!

  बेळगाव : 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले बेळगुंदी येथील हुतात्मा झालेले भावुक चव्हाण यांचे सुपुत्र श्री. शट्टुपा भावकू चव्हाण हे आजाराने उपचार घेत आहेत. सध्या त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असून आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी समस्त सीमाभागातील दानशूर व्यक्तींना, समितीच्या …

Read More »

मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित प्रकरणी तरुणावर गुन्हा

  बेळगाव : वडगावच्या मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ करून प्रसारित केल्याप्रकरणी तरुणावर माळमारुती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय श्याम कागलकर (वय 27, रा. रामनगर, गँगवाडी) असे संशयिताचे नाव आहे. सद्या मंगाई यात्रा सुरू आहे. याला अनुसरून अजयने व्हिडीओ करून आपल्या स्टेट्सला ठेवला होता. यामध्ये त्याने आपण हिंदूंनी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच …

Read More »

तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी..

  बेळगाव : प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना दिल्या. ब्रिजच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे मागील ब्रिजच्या काँक्रीटवरील सर्व डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी खडी …

Read More »

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे 12 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथे आंदोलन

  बेळगाव : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली 12 ऑगस्टपासून राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी दिली. बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघातर्फे बेळगाव शहरातील साहित्य भवन येथे कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्राथमिक शाळा शिक्षक …

Read More »

नाना शंकरशेठ यांची १५९ वी पुण्यतिथी गांभीर्याने

  बेळगाव : दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाना शंकरशेठ यांची १५९ वी पुण्यतिथी बुधवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. संयुक्त महाराष्ट्र चौक, नाना शंकरशेठ मार्ग येथे गांभीर्याने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश …

Read More »

उज्वलनगर नाल्यात आढळला अनोळखी मृतदेह!

  बेळगाव : बेळगाव शहरालगतच्या उज्वलनगर येथील नाल्यात आज बुधवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. उज्वलनगर येथील पावसाच्या पाण्याने प्रवाहित असलेल्या एका नाल्यात अनोळखी युवकाचा मृतदेह झाडाच्या फांदीला अडकून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नाल्यातून बाहेर …

Read More »

वडगावात मंगाई देवी यात्रेचा उत्साह; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

  बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव येथील मंगाई देवीच्या यात्रेला मंगळवारी (दि. ३०) उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ११ नंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी प्रारंभ केला. रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी मंगाई देवीचे दर्शन घेतले. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळून गेले होते. शहापूर, वडगाव परिसरातील शेतकऱ्यांची देवी म्हणून मंदिराची ख्याती आहे. …

Read More »

वाढदिवसाचे औचित्य साधून येळ्ळूर ग्रामपंचायतीला पुस्तके भेट

  बेळगाव : येळ्ळूर येथील ग्रामपंचायतीत ग्रंथालयांची स्थापना करून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही होत आहेच शिवाय अनेकांनी आजवर येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील आयोजित उपक्रमांविषयी प्रशंसा व्यक्त केली आहे.. तर येळ्ळूर येथील युनियन बँकचे मॅनेजर अभिजीत सायमोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त …

Read More »

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला बेळगाव पोलिसांकडून अटक

  बेळगाव : माळमारुती पोलिसांनी हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथून दयानंद रामू जिनराळ नावाच्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांनी ट्रेनिंग स्कूल उघडून मी बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देईन, असा विश्वास दाखवून प्रसंगी बनावट सीबीआय, ईडी, आयटी अधिकारी बनून कोट्यवधी रुपये गोळा केले. माळमारुती पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याला अटक केली असून …

Read More »

बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड

  उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची निवड लॉटरीद्वारे बेळगाव : बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील यांची लॉटरीद्वारे निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अशोक सुरुर यांनी काम पाहिले. दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष- उपाध्यक्षपदासाठी सोमवारी (दि. २९) निवडणूक पार पडली. अध्यक्षपद अनुसुचित जाती-जमाती महिलेसाठी तर …

Read More »