Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

खादरवाडी येथील परड्यातील आईचा यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून पाळण्यात येणार वार

  बेळगाव : खादरवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या परड्यातील आईचा यात्रोत्सव साजरा करण्याचे देवस्थान कमिटीने ठरविले आहे. त्यानिमित्ताने गावात देवीचे वार पाळण्यात येणार आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 3 मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत खादरवाडी गावात वार पाळण्यात येणार आहेत. या काळात गावातील व्यवहार, शेती कामे त्याचप्रमाणे दुकाने …

Read More »

काँग्रेसची हमी आणि भाजपचे चंबू मॉडेल याच धर्तीवर लोकसभा निवडणूक : रणदीपसिंह सुरजेवाला

  बेळगाव : राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज भाजपवर हल्लाबोल करत आगामी लोकसभा निवडणूक हि काँग्रेसच्या हमी योजना विरुद्ध भाजपचा रिकामा चंबू या धर्तीवर होणार असल्याचे सांगितले. आज बेळगाव काँग्रेस भवनात आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारचा अजेंडा राज्याचा बदला घेण्याचा आहे. …

Read More »

भीषण अपघातात अथणी येथील दोघांचा जागीच मृत्यू

  बेळगाव : लॉरीला पाठीमागून बोलेरो गाडी आदळल्याने बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तुमकूर जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील चिक्कनहळ्ळीजवळ हा अपघात झाला. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील उमेश नागप्पा आणि संतोष सुरेश अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बोलेरो चालक गंभीर जखमी झाला असून त्याला शिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

समितीच्या उमेदवारांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट!

  बेळगाव : बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी मंगळवारी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. लोकसभेच्या उमेदवारांसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यानी बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातील परिस्थितीची माहिती दिली तसेच समितीने निवडणूक लढविण्याचा निर्णय …

Read More »

“आम्ही वाचतो” उपक्रमाला चळवळीचे स्वरूप यावे; चर्चेतून उमटलेला सूर

    बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त “आम्ही वाचतो” हा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात बेळगाव आणि परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या चर्चेत ‘आम्ही वाचतो’ उपक्रमाला चळवळीचे स्वरूप यावे असा सूर उमटला. …

Read More »

“त्या” बँकेच्या महिला उपाध्यक्षांचा मानसिक छळ!

  “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे खूप खोलवर असल्याचे दिवसागणिक समोर येत आहे. नोकर भरती घोटाळा हा जरी वरवरचा असला तरी बँकेच्या अनेक व्यवहारात भ्रष्टाचाराचा आलेख अगदी चढा आहे. त्यामुळे एकंदरीत सदर सहकारी बँक अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसत आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असताना स्वतःच्याच संस्थेच्या एका महिला …

Read More »

बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जण रिंगणात राहिले आहेत. बेळगावची खरी लढत जरी काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर विरुद्ध भाजपचे जगदीश शेट्टर यांच्यात असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्याकडे देखील लक्ष असणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या आठ जणांनी सोमवारी …

Read More »

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; बेळगावात महिला शक्तीचा एल्गार!

  बेळगाव : हुबळी येथील एका खाजगी महाविद्यालयातील तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत असून, या घटनेचे पडसाद आता बेळगाव पर्यंत पसरले आहे. हुबळीत झालेल्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी बेळगावमध्ये विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले. हुबळी येथील युवतीचा खून …

Read More »

सार्वजनिक वाचनालयात उद्या “आम्ही वाचतो” कार्यक्रम

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि. 23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे बरेचसे विद्यार्थी वाचन करतात, जाणकारीने वाचतात, त्यांना साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम आवडतात, शिवाय विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ते भरपूर वाचन करतात, त्यामुळे पुस्तक …

Read More »

“त्या” बँकेच्या भरती घोटाळ्यात अनेक धक्कादायक बाबी उघड!

  बेळगाव : नोकर भरती प्रकरणी घोटाळा झाल्याचा संशय आल्याने सलग तीन दिवसापासून चौकशीसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बेळगावमधील “त्या” बँकेत ठाण मांडून आहेत. सदर प्रकरणी अधिकारी कसून चौकशी करत असून, चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. वरकरणी या आर्थिक संस्थेचा पसारा मोठा होत …

Read More »