बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके आणि विधान परिषद सदस्य हणमंत निराणी उपस्थित होते. शुक्रवारपासून नामांकन पत्र अर्थात …
Read More »निलजी येथे उद्यापासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
सांबरा : निलजी (ता. बेळगाव) येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्रीराम वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ व श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवार दि. १६ एप्रिलपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य हभप वै. आप्पासाहेब तात्यासाहेब वासकर महाराज व हभप वै. बाळाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी पारायण …
Read More »समितीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन निवडून आणू; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन निवडून आणा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी मराठा मंदिर येथे मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरी करण्यात आली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक महेश हगीदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर वक्ते इंद्रजीत मोरे, शैला पाटील, कमल हलगेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, बी. …
Read More »युवा समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने युवा समिती कार्यालय टिळकवाडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला, तसेच बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आमचा लढा असून लोकशाहीचा …
Read More »संजीवीनी फौंडेशनच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उचगाव ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य एल डी चौगुले आणि पत्रकार अशोक चौगुले तसेच सीईओ मदन बामणे उपस्थित होते. प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत लक्ष्मी झेंडे यांनी केले. त्यानंतर …
Read More »गांधीनगर, शिवाजीनगर परिसरात महादेव पाटील यांचा प्रचार
बेळगाव : म. ए. समितीच्यावतीने महादेव पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. शनिवारी गांधीनगर, दुर्गामाता रोड परिसरामध्ये प्रचार केला. यावेळी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. म. ए. समितीतर्फे उचगाव, येळ्ळूर यासह इतर गावांमध्ये देखील …
Read More »माजी आमदार संजय पाटील यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस महिला कार्यकर्त्यांची निदर्शने
बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांच्या हिंदवाडी येथील निवासस्थानासमोर निदर्शने केली. स्वत:ला परंपरावादी आणि महिलांचे रक्षण करणारा भाजप पक्ष म्हणवून घेणारे माजी आमदार संजय पाटील यांनी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री …
Read More »म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराला प्रारंभ
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली ७० वर्षे लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. समिती नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उचगाव येथील जागृत देवता श्री मळेकरणी देवीच्या मंदिरात पूजा करून महादेव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर त्यांनी उचगावात फेरी काढून गावकरी व …
Read More »बेळगावसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी!
बेळगाव : बेळगावसह उपनगरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. मागील दोन दिवसात शहर व परिसरात तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज वळीवाने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. मागील काही दिवसात उष्माघाताने हैराण झालेल्या बेळगावकरांनी गारवा अनुभवला आहे. आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta