Sunday , July 26 2026
Breaking News

गांधीनगर, शिवाजीनगर परिसरात महादेव पाटील यांचा प्रचार

Spread the love

 

बेळगाव : म. ए. समितीच्यावतीने महादेव पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. शनिवारी गांधीनगर, दुर्गामाता रोड परिसरामध्ये प्रचार केला. यावेळी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

म. ए. समितीतर्फे उचगाव, येळ्ळूर यासह इतर गावांमध्ये देखील प्रचार करण्यात आला. आता शहरामध्ये प्रचार करण्यात येणार आहे. शहरातील गांधीनगर तसेच इतर परिसरात प्रचार करण्यात आला. येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यात येणार आहे. म. ए. समितीने महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली. गांधीनगर परिसरात रमाकांत कोंडूस्कर, चंद्रकांत कोंडुस्कर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, श्रीकांत कदम, मदन बामणे, रणजित चव्हाण-पाटील, पियुष हावळ, उमेश पाटील, शिवानी पाटील, साधना पाटील यांच्यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *