बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने युवा समिती कार्यालय टिळकवाडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला, तसेच बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आमचा लढा असून लोकशाहीचा निश्चित विजय होईल अशी आशा व्यक्त केली,
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, खजिनदार विनायक कावळे, उपखजिनदार इंद्रजित धामणेकर, चिटणीस प्रतीक पाटील, महांतेश अलगोंडी, संतोष कृष्णाचे आदी उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले.