बेळगाव : समर्थ नगर पहिला क्रॉस येथे मीनाताई बेनके यांच्या हस्ते चिमूकल्यानी साकारलेल्या कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मीनाताई बेनके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन केले. यावेळी चिमुकल्यांनी साकारलेल्या संपूर्ण किल्ल्याची माहिती यांना दिली. यावेळी चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांना आनंदवाडी कुस्ती स्पर्धेसाठी निमंत्रण
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे आनंदवाडी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. तेरा व चौदा जानेवारीला राज्यस्तरीय गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. हिंदवाडी येथील आखाड्यात स्पर्धा संपन्न होणार आहेत. कुस्तीची आवड निर्माण व्हावी. तरुणवर्गाने खेळाकडे वळावे याच उद्देशाने गेली तेरा …
Read More »जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी मुबीन अब्दुलअजीज मुजावर यांची निवड
बेळगाव : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष के. अब्दुल जब्बार यांच्या मान्यतेने आणि के.पी.सी.सी. अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष राजा सलीम काशीमनवर यांनी मुबीन अब्दुलअजीज मुजावर यांना …
Read More »छ. शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी ‘नवहिंद क्रीडा केंद्रा’ची 5 लाखची देणगी
येळ्ळूर : हिंदुस्थानचे आराध्यदैवत छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आपल्या येळ्ळूर गावात महाराजांची पंचधातूची मूर्ती स्थापन व्हावी, ही गावकऱ्यांची ईच्छा पूर्णत्वाच्या मार्गावर असून आज खऱ्याअर्थाने ‘नवहिंद परिवारा’ने दिलेल्या 5 लाख रुपयांच्या भरघोस देणगीने शिक्कामोर्तब झाले आहे. ‘नवहिंद’ने आधुनिक येळ्ळूर गावच्या जडणघडणीत आपलं योगदान दिले आहेच. आज खरोखर आम्ही …
Read More »बेळगावात 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ
बेळगाव : कर्नाटक शासन, बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन विभाग, ग्रामीण व लघु उद्योग विभाग, कृषी विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ, जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आयोजित 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शन व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री सतीश जारकीहोळी …
Read More »कर्नाटक संभ्रम उत्सव 12 डिसेंबर रोजी
बेळगाव : म्हैसूर राज्याचे ‘कर्नाटक’ असे नामकरण होऊन 2023 मध्ये 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता “कर्नाटक संभ्रम-50” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णविधानसौधच्या प्रांगणात केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर आणि विधान …
Read More »समिती कार्यकर्त्यांनी माफीचे साक्षीदार बनू नये : प्रकाश मरगाळे
बेळगाव : कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी शिनोळी येथे रास्तारोको करण्यात आला होता. रास्तारोको केल्यामुळे चंदगड पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे कोल्हापूर पोलिस प्रशासनाने मागे घ्यावेत असे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …
Read More »शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि जिंकणार : दीपक दळवी
दळवी यांच्या जन्मदिनी युवा कार्यकर्त्यांनी घेतली भेट, दिल्या शुभेच्छा आणि घेतले आशीर्वाद बेळगाव : दि. ७ डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांचा ८२ वा वाढदिवस, याचे औचित्य साधून समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा दिल्या तसेच आशीर्वादही घेतले, गेल्या वर्षभरापासून दळवी …
Read More »सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी; आर.अशोक यांची विधानसभेत मागणी
बेळगाव : नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत द्यावी, आर्थिक परिस्थिती संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी विधानसभेत बोलताना दिला. दुष्काळी परिस्थिती संदर्भात आज विधानसभेत झालेल्या चर्चेप्रसंगी पुढे बोलताना आर. अशोक म्हणाले, पावसा अभावी राज्यात …
Read More »संवाद लेखन स्पर्धेचा निकाल १० रोजी
बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta