Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर चव्हाण यांची निवड

  बेळगाव : तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद काही दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीने नवीन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ऍड. सुधीर चव्हाण यांची निवड केली. जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या …

Read More »

ग्राम वन केंद्रांच्या ऑपरेटर्सची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी अत्यल्प रक्कम देऊन त्यावरही जीएसटी आकारण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्राम वन केंद्रांच्या ऑपरेटर्सनी केंद्र बंद करून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. राज्यातील गृहलक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ग्रामवन केंद्रांच्या ऑपरेटर्सना प्रति नोंदणीसाठी 20 रुपये देण्यात येतात. मात्र त्यातील 8 रुपये जीएसटी, टीडीएससाठी कपात …

Read More »

उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड

  बेळगाव : उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असल्याने मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची अध्यक्षपदी तर मथुरा यांचे पती बाळकृष्ण खाचू तेरसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यात असलेले उचगाव गाव आहे. ८००० जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणूक पार …

Read More »

क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णांची मूर्ती चांगल्या जागी बसवा!

  बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथे नगरपंचायतीसमोरच्या गावातील सोसायटीच्या जागेत ५ जुलै रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती सदर जागेतून हटवून मोक्याच्या आणि चांगल्या जागेत बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी केली आहे. आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना याबाबत …

Read More »

श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे गो-रक्षकांचा सत्कार

  बेळगाव : शहरातील आरटीओ सर्कल येथील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे आयोजित आपल्या देशात मातृ स्वरूप मानल्या जाणाऱ्या गाईंच्या रक्षणकर्त्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिर येथे गेल्या शनिवारी दुपारी आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी …

Read More »

बेळगावच्या तनिष्का आणि आयुषी राज्यस्तरावर चमकल्या

  बेळगाव : बेळगाव येथील तनिष्का कपिल काळभैरव हिने राशी व्ही रावचा सरळ गेममध्ये सहज पराभव करून बेंगळुरू येथे कॅनरा युनियनने आयोजित केलेल्या राज्य क्रमवारीत टेबल टेनिस स्पर्धेत अंडर-13 मुलींच्या एकेरी विजेतेपदावर कब्जा केला. बेळगाव येथील प्रशिक्षक संगम बैलूर यांच्याकडून प्रशिक्षण घेत असलेल्या तनिष्काने राशीविरुद्धच्या सामन्यात ११-६ आणि ११-५ असे …

Read More »

दूधसागर रेल्वे मार्गावरील दरड हटविली!

  बेळगाव : मुसळधार पाऊस असूनही सतत आणि अथक प्रयत्नानंतर कॅसल रॉक आणि कॅरनझोल रेल्वे मार्गावरील दरड हटविण्यात आली. आज दुपारी 12 वाजता ट्रॅक पुनर्संचयित करण्यात आला आणि ‘फिट’ असल्याचे प्रमाणित करण्यात आले. सुरक्षेच्या मापदंडांच्या संदर्भात ट्रॅकच्या फिटनेसचे मूल्यांकन आणि प्रमाणित करण्यासाठी ताबडतोब एक लोकोमोटिव्ह ट्रॅकवर चालविण्यात आला आणि चाचणी …

Read More »

माळी गल्लीत डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण

  बेळगाव : माळी गल्ली येथील छत्रपती श्री शिवाजी युवक मंडळ आणि प्रसाद होमिओ फार्मसी यांच्या वतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते शिबिराचे लस देवून उद्घाटन करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत माळी गल्लीतील मंडळाने सतत डेंग्यूस …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात पोक्सो कायद्यावर जनजागृती कार्यक्रम

  बेळगाव : दिनांक 27/07/2023 रोजी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात पोक्सो या कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने कायदेतज्ञ ऍड. फकीरगौडा पाटील, ऍड. जगदीश सावंत आणि ऍड. सरिता पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश नंदिहळी यांनी पाहुण्यांचे स्वागत …

Read More »

हिंडलगा कारागृहात दोन कैद्यांमध्ये मारामारी

  बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृहात दोन कैद्यांमध्ये मारामारी होऊन स्क्रू ड्रायव्हरने जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली. हाणामारीत एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला स्क्रू ड्रायव्हरने पाच वार केले आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शंकर भजंत्री याने खुनाचा प्रयत्न करणारा कैदी आहे. साईकुमार हा …

Read More »