Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव

विजयकांत डेअरीतर्फे ‘किंग आईस्क्रीम’

  बेळगाव : बेळगावात सुरू झालेल्या आणि राज्यभर घराघरात नावारूपाला आलेल्या विजयकांत डेअरीने आता ग्राहकांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आपल्या ग्राहकांसाठी नवीन ‘किंग आईस्क्रीम’ बाजारपेठेत दाखल केले असून नवीन किंग आईस्क्रीमचे उत्पादन बाजारात दाखल करण्यात आले आहे. विजयकांत डेअरीच्या आईस्क्रीमचे नवीन उत्पादन आज एका सोहळ्याच्या माध्यमातून दाखल करण्यात …

Read More »

मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची; माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत

  महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप खानापूर : मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही मागे पडत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य द्यावे. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत …

Read More »

श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानतर्फे कंग्राळी खुर्द येथील मराठी मॉडेल शाळेत दप्तर (बॅग) वितरण

  बेळगाव : श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (बॅग) वितरण करत आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एसडीएमसी सदस्या सौ. पौर्णिमा मोहिते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

येळ्ळूर येथील 30 वर्षाचा सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा वाद निकालात!

  बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौक (लक्ष्मी स्थळ) येथील 30 एक वर्षे वादात असलेल्या सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा आज येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने निकाल लावण्यात आला. येळ्ळूर ग्राम पंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील असताना या जागेच्या प्रश्नाला स्थानिक लोकांना नोटीसा पाठवून त्यांच्या जागेचे कागद पत्र मागून घेऊन स्थळाची पाहणी करून तेथील …

Read More »

देवाच्या नावाने प्राण्यांचा बळी देऊ नका : दयानंद स्वामीजी

  बेळगाव : पशुबळी बंदीसाठी जनजागृती केल्यामुळे वडगावच्या ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रेत पशुबळी पूर्णपणे रोखण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया जागतिक प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली. बेळगाव शहरात होणाऱ्या अनेक यात्रांपैकी मोठ्या प्रमाणात भरविल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेत यंदा प्रथमच पशुबळी प्रथा …

Read More »

गरजू मुलाला यंग बेळगाव फाउंडेशनची शैक्षणिक मदत!

  बेळगाव : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कष्टाळू गरजू विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी मदत करण्यासाठी पाऊल उचलताना यंग बेळगाव फाउंडेशनने माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक शैक्षणिक निधी आयएमए इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यंग बेळगाव फाउंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच एका स्थानिक हॉटेलला भेट दिली …

Read More »

एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ती दुथडीवरून वाहत आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करणारी जॅकवेल खराब झाली असून जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली. गुरुवारी सकाळी सदर घटना घडली असून सर्वजण सुरक्षित आहेत. बोट …

Read More »

काकती येथील भूखंड आणि बांधलेले घर परस्पर नावावर करून वृद्ध महिलेची फसवणूक!

  बेळगाव : कष्ट करून विकत घेतलेला भूखंड आणि बांधलेले घर एका व्यक्तीने परस्पर नावावर करून घेऊन एका वृद्ध महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. निराधार असलेली ही वृद्ध महिला सध्या हुबळी येथील सिद्धारूढ मठात वास्तव्यास आहे. उतारवयात आधार देणारी मुले नाहीत. नातवंडे नाहीत. पतीचेही निधन झाले आहे. या …

Read More »

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्याच्या वारसाला मदतीची गरज!

  बेळगाव : 1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले बेळगुंदी येथील हुतात्मा झालेले भावुक चव्हाण यांचे सुपुत्र श्री. शट्टुपा भावकू चव्हाण हे आजाराने उपचार घेत आहेत. सध्या त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असून आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी समस्त सीमाभागातील दानशूर व्यक्तींना, समितीच्या …

Read More »

मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित प्रकरणी तरुणावर गुन्हा

  बेळगाव : वडगावच्या मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ करून प्रसारित केल्याप्रकरणी तरुणावर माळमारुती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय श्याम कागलकर (वय 27, रा. रामनगर, गँगवाडी) असे संशयिताचे नाव आहे. सद्या मंगाई यात्रा सुरू आहे. याला अनुसरून अजयने व्हिडीओ करून आपल्या स्टेट्सला ठेवला होता. यामध्ये त्याने आपण हिंदूंनी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच …

Read More »