Monday , September 21 2026
Breaking News

…म्हणे समितीवर बंदी घाला; करवे शिवरामेगौडा गटाची मागणी

Spread the love

 


बेळगाव : विधिमंडळ अधिवेशन जवळ येईल तसे कानडी संघटनांची बेळगावात पुन्हा वळवळ सुरु झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी करवे शिवरामेगौडा गटाने आज बेळगावात आंदोलन छेडले. करवे शिवरामेगौडा गटाने महामेळाव्याला विरोध करत म. ए. समितीचा निषेध करून समितीवर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे शिवरामगौडा गटाचे अध्यक्ष वाजीद हिरेकोडी म्हणाले की, बेळगाव अधिवेशनादरम्यान समितीने महामेळावा घेण्याचा घाट घातला आहे. महामेळावा घेण्यासाठी ते पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर दबाव आणत आहेत, बेळगाव कन्नडिगांची भूमी आहे. ती बळकावण्याचा प्रयत्न केला तर समितीला योग्य धडा शिकवू, असा इशारा दिला. जर समितीचा महामेळावा झाला तर आम्ही पोलिसांकडे दाद मागू आणि समितीच्या विरोधात उग्र आंदोलन करू. बेळगाव सोडून जाईपर्यंत समिती नेत्यांना सोडणार नाही, अशी दर्पोक्ती केली. राज्य सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे म. ए. समितीवर बंदीचा गांभीर्याने विचार करून सरकारने दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी वाजिद हिरेकोडी यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *