बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये आज 24 ऑगस्ट रोजी कोलकत्ता व महाराष्ट्र या ठिकाणी शाळकरी मुलींच्या वर झालेल्या अत्याचाराचा सर्व विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर काळ्या फिती बांधून व काळे कपडे परिधान करून या घटनेचा निषेध केला. सध्या वाढत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटना आपल्या …
Read More »दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची संगत केल्यास मनुष्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते : परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज
बेळगाव : दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची संगत केल्याने मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याला इतिहासही अपवाद नाही त्यामुळे वैष्णवानी अभक्त आणि कुसंगांचा संग करू नये” असे आवाहन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी आपल्या कथानकात केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण कथा महोत्सवाच्या तिसऱ्या …
Read More »धनश्री सोसायटी म्हणजे ठेवीदारांचा विश्वास!
“इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे गेल्या 31 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रशस्त अशा स्वतःच्या इमारतीत उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी साडेदहा वाजता स्थलांतर होत आहे त्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा घेण्यात आलेला आढावा…. …
Read More »हत्तरगी येथील श्री हरी काका गोसावी मठात दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी विविध कार्यक्रम
डॉ. आनंद महाराज गोसावी यांची माहिती बेळगाव : हत्तरगी (ता. जि. बेळगाव ) येथील पुरातन श्री हरी काका गोसावी भागवत मठाचे वतीने दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची तयारी झाली आहे. यानिमित्ताने विविध आध्यात्मिक, संगीत सेवा यासह गोपाळ काला कार्यक्रम आयोजित करण्यात आला …
Read More »जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मोहन कारेकर होते तर व्यासपीठावर सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी मोहन कारेकर यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अशोक …
Read More »कर्नाटकातील रस्ता दुरुस्तीसाठी महाराष्ट्रातील नागरिकांचा रास्तारोको
बेळगाव : महाराष्ट्राच्या सीमेनजीक कर्नाटक हद्दीत अत्यंत खराब झालेल्या बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संतप्त वाहनचालक आणि नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील शिनोळीजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. बेळगाव – वेंगुर्ला या रस्त्याची महाराष्ट्र सीमेजवळ कर्नाटक हद्दीत खड्डे पडून वाताहत …
Read More »प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस सांबरा येथील माऊली लॉन येथे अनोख्या रीतीने नुकताच साजरा झाला. चव्हाट गल्लीतील देवदादा ज्योतीबा सासनकठी मंडळ, शिवजयंती मंडळ, बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळ, सावरकर ग्रुपसह विविध मंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्यांना दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली. यावेळी त्यांच्या उत्तम …
Read More »तुकाराम बँकेला 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा : चेअरमन प्रकाश मरगाळे
सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शहापूर -बेळगाव या सहकारी बँकेने आर्थिक वर्षात 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून संस्थेने यंदा सभासदांसाठी 13% लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश आप्पाजी मरगाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली …
Read More »सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी स्वागत समितीची बैठक
बेळगाव : सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दीच्या स्वागत समिती सभासदांची बैठक आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील हे होते. प्रारंभी जिजामाता बँकेचे व्यवस्थापक श्री. नितीन आनंदाचे यांनी सर्व उपस्थित यांचे स्वागत करून मागील बैठकीचा …
Read More »विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात मोबाईल केबल, फांद्यांचे विघ्न नकोत!
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातील काही गणेशोत्सव मंडळांनी येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये नेण्याचे नियोजन करत आहेत. यापुढेही सुट्टीच्या दिवशी शहर व उपनगरात अनेक मंडळांचे आगमन सोहळे होणार आहेत. शहरातील व प्रमुखतेने श्री …
Read More »