बेळगाव : वडगाव परिसरात सापडलेल्या निराधार गतिमंद महिलेची मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्या पुढाकारातून जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. गेल्या वीस दिवसांपासून मंगाई मंदिर वडगाव या परिसरात यल्लूबाई दंडगल नावाची गतिमंद महिला फिरत होती. मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते युवराज पाटील व योगेश …
Read More »शांताई वृद्धाश्रमात लसीकरण
बेळगाव : कोरोना काळात योगदान दिलेल्या आशा कार्यकर्त्या आणि आरोग्याधिकारी यांचा सत्कार शांताई वृद्धाश्रमात करण्यात आला. माजी महापौर विजय मोरे यांनी सर्व कोविड वॉरियरांचा सत्कार केला. या जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ आणि तालुका अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार, मनपा आरोग्याधिकारी संजीव डूमगोळ, टी एच ओ शिवानंद मास्तीहोळी, डॉ. शिवस्वामी एम …
Read More »जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे निराधार गरजूंना किराणा साहित्याचे वितरण
बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निराधार केंद्रातील गरजूंना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागत आहे. तसाच त्रास निराधारानाही सोसावा लागत आहे, याची दखल जिव्हाळा फाऊंडेशनने घेऊन येथील निवारा केंद्रातील 48 गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या हाकेला साद घालत अमित पाटील यांनी …
Read More »कित्तूर ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी 50 कोटी
10 कोटीच्या कृती आराखड्यास मंजूरी : 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता बंगळूरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता दिली. 223 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखालील केम्पेगौडा विकास मंडळाच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी …
Read More »आगामी निवडणुकीसाठी समितीच्या सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविणे गरजेचे
खानापूर (प्रतिनिधी) : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समितीची स्थापना झाली आहे. या भागातील आपली मराठी अस्मिता दाखवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठी माणसाने आजपर्यंत काम केलेले आहे. समितीत अनेक वेळा गटबाजी झाली असली तरी जि. पं. व ता. पं. निवडणूकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. हाआजपर्यंतचा इतिहास आहे. आगामी जिल्हा …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्पास सुरुवात
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्प उपक्रमात सहभाग दर्शवण्यासाठी ब.कुडची विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पुढाकार घेवून युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.सीमाभागातील प्रत्येक गावाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी झाडे लावावी आणि आपल्या बेळगावला जे गरिबांचे महाबळेश्वर …
Read More »शिवारातील रस्ता योजना शेतकऱ्यांच्या हिताची : आमदार अनिल बेनके
बेळगाव : शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे, असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत.. यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीसाठी योग्य …
Read More »पारंपरिक गणेशोत्सवाला प्रशासनाने परवानगी द्यावी
मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (प्रतिनिधी) : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने गणेश भक्तांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आचरण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात …
Read More »सुुराज्य निर्माण आंदोलनतर्फे निवेदन
बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सध्याची परिस्थिती नागरिकांना त्रासदायक ठरते आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या परिस्थितीचा विचार करावा आणि नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी उपाययोजनांची कार्यवाही करावी, अशी मागणी सुराज्य निर्माण आंदोलन या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवून देण्यात आले. …
Read More »उपमुख्यमंत्री पुत्राच्या कारच्या ठोकरीने १ ठार
मृत : कुडलेप्पा मोळी चिदानंद सवदी बेळगाव : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील कुडलसंगम क्रॉसजवळ झाला. अपघातानंतर मृताच्या नातेवाईक आणि स्थानिकांना चिदानंद सवदी यांनी धमकीही देल्याचे समजते. चित्रदुर्ग-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर कुडलसंगम क्रॉसजवळ …
Read More »