Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

कावळेवाडीचा उदयोन्मुख कुस्तीपटू पै. रवळनाथला दहा हजाराचे सहकार्य

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयच्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मान करण्यात आला. रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे. बाबा भोलादास आखाड्यात दीड महिना सराव केला. सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीय पातळीवर कुस्ती कोच अशवनी दया यांच्याकडे त्याने प्रशिक्षण …

Read More »

अक्षता नाईक उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

बेळगाव : अतिशय निष्ठेने पत्रकारितेचे व्रत हाती घेतल्याबद्दल तसेच समाजात कर्तृत्वाने यश साध्य करता येते हे दाखवून देत गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल अक्षता नाईक यांचा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर सन्मान सोहळा कोल्हापूर येथील नष्टे लॉन येथे आज …

Read More »

बेळगावात कन्नड साहित्य भवनात अज्ञाताचा गोंधळ

बेळगाव : बेळगावातील कन्नड साहित्य भवनातील महिला शौचालयात घुसुन रविवारी सकाळी एकाने चांगलाच गोंधळ घातला. त्याला बाहेर काढण्यासाठी भवनाचे कर्मचारी आणि पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. आज सकाळी 7 च्या सुमारास भवनातील महिलांसाठी असलेल्या शौचालयात घुसून या बहाद्दराने आतून कडी लावली. काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नव्हता. भवनच्या …

Read More »

बेळगावात महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन

बेळगाव : जुलमी मोगली राजवटीविरोधात तगडी झुंज देऊन देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या मेवाडचे शूर रजपूत राजे महाराणा प्रताप यांच्या 482व्या जयंतीनिमित्त बेळगावात रविवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. शहर-परिसरातील रजपूत समाज बांधवांच्या वतीने यानिमित्त महाराणा प्रताप यांच्या अर्ध पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. …

Read More »

बेळगावात श्रमिक पत्रकार संघातर्फे विशेष कार्यशाळा

बेळगाव : बेळगावात श्रमिक पत्रकार संघातर्फे रविवारी कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशन, बेंगलोर आणि जिल्हा शाखा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षांचे पूर्वावलोकन तसेच ‘बदलते कायदे आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर ही विशेष कार्यशाळा बेळगावातील जेएमसी जिरगे भवन येथे पार पडली. हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांचे सानिध्य या कार्यक्रमाला लाभले. …

Read More »

तर सीमाभागात शिवसेना म्हणून पुढे येऊ : संजय राऊत

बेळगाव : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावातून भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला समितीतील दुहीबाबत कानपिचक्या दिल्या आहेत. आगामी काळात शिवसेना म्हणून पुढे येऊ असे त्यांनी म्हटले. गेले दोन दिवस राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी त्यांची सभा कागल येथे होणार आहे. एकीकरण समितीतील दुहीवर …

Read More »

सीमाप्रश्नी लवकरच तज्ञ समितीची बैठक : मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

बेळगाव : सीमाप्रश्नी तज्ञ समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे. तसेच बैठकीनंतर सीमाप्रश्नी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. सीमाप्रश्न लवकर सुटण्यासाठी पावले उचलू, अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सीमाप्रश्नी तज्ञ कमिटीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे मंत्री जयंत पाटील यांची …

Read More »

शहीद जवानाला बेळगावात मानवंदना

बेळगाव : शहीद जवान प्रशांत जाधव याला बेळगाव विमान तळावर अभिवादन करण्यात आले. लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव (वय 27) हा शहीद झाला होता. दरम्यान, शहिद जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव रविवारी (दि. 29) …

Read More »

तुरमुरी येथील चोरी प्रकरणी दोघा चोरट्यांना अटक

वडगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई बेळगाव : तुरमुरी गावात 8 एप्रिल रोजी झालेल्या चोरी प्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. वडगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी …

Read More »

शहापुरातील दोन मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यासंदर्भात आंदोलन

बेळगाव : खडेबाजार शहापूर येथील गौड ब्राह्मण समाजाच्या पुरातन श्री गणेश आणि श्री मारुती ही दोन मंदिरे खुले करण्यासाठी, आज शनिवारी सायंकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सदर मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सदर दोन्ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाकडून रास्ता …

Read More »