Thursday , June 4 2026
Breaking News

केदनूर ग्रामस्थांचे माजी सैनिकाविरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : श्रावण मासानिमित्त केदनूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भजन आणि पूजा कार्यक्रमादरम्यान एका माजी सैनिकाने मंदिरात धुडगूस घालून माईक तोडल्याचा प्रकार केला. सदर माजी सैनिकाने येथील भाविकांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ देखील केली असून याप्रकरणी न्याय मागण्यासाठी केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
केदनूर गावातील विठ्ठल रखुमाई देवस्थानात सुरु असलेल्या माईक चाचणी दरम्यान काहीजणांनी मंदिरात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील माईकची तोडफोड केली. गोपाळ अण्णाप्पा संभाजी नामक एका व्यक्तीने मंदिरात येऊन भाविकांना त्रास देण्यास सुरुवात केली. हे प्रकार सातत्याने होत असून यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत धरणे आंदोलन छेडले. या व्यक्तीपासून आपल्याला संरक्षण मिळावे असा आग्रह करत केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करताना केदनूर गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटी सदस्य, वारकरी, संत मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *