Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

येळ्ळूर परिसरात भात पेरणीला सुरुवात

बेळगाव : मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. येळ्ळूरच्या पश्चिम भागाला 15 मे पासून पेरणीला सुरुवात होत असते. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती. दरवर्षी धुळवाफ पेरणी होत होती. पण यावर्षी जमीन ओली असल्यामुळे पेरणी थोडी उशिरा चालू झाली आहे. बाकी शेतातील अजून बरीचशी …

Read More »

गरजू वृत्तपत्र विक्रेत्याला ‘वन टच’चा मदतीचा हात

बेळगाव : घरोघरी सर्व प्रकारची वृत्तपत्र आणि दुधाचे वाटप -विक्री मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कोरे गल्ली शहापूर येथील रमेश सरवडे यांची गरज लक्षात घेऊन त्यांना जुना गुड्स शेड रोड येथील वन टच फाउंडेशनतर्फे सुमारे एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल …

Read More »

क्रीडा क्षेत्रात करिअर घडवा : युवा नेते श्रीनिवास पाटील

ऐनापूर येथे कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन उगार खुर्द : फक्त शहरी भागातून नव्हे तर खेड्यातूनही भविष्यात राष्ट्रीयस्तरावरचे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देऊन त्यामध्ये आपले करिअर घडवा, असे आवाहन युवानेते श्रीनिवास पाटील यांनी केले. ऐनापूर येथे नुकत्याच खुल्या कब्बड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. याचे उद्घाटन करून ते बोलत …

Read More »

एकत्रित येण्यासाठी महोत्सवांची गरज

आ. श्रीमंत पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : आपल्या परिसरात कुठे ना कुठे पंचकल्याण महोत्सव होत असतो, ही आनंदाची बाब आहे. समाजाने एकत्रित येण्यासाठी असे महोत्सव, समारंभ व कार्यक्रमांची गरज आहे, असे मत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ (ता. कागवाड) येथेल श्री …

Read More »

स्वरूप धनुचे याला राज्यस्तरीय मिनी ओलंपिक जलतरण स्पर्धेत तीन पदके

बेळगाव : नुकताच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या राज्य पातळीवरील मिनी ओलंपिक जलतरण स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात बेळगावच्या स्वरूप सतीश धनुचे याने विविध जलतरण प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली. 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात कास्य पदक मिळविले. तो …

Read More »

24 पासून बारावी पेपर तपासणीस प्रारंभ

बेळगाव : पदवीपूर्व द्वितीय वर्षाची म्हणजे बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून आता पेपर तपासणीला सुरुवात होणार असून येत्या मंगळवार दि. 24 मे पासून बेळगाव शहरातील 8 केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. दहावीच्या निकालानंतर आता शिक्षण खात्याने बारावी परीक्षेचा निकाल लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पेपर …

Read More »

‘वन टच’चा स्तुत्य उपक्रम; गरजूंना जीवनावश्यक सहित्याचे वाटप

बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील गुडसशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाऊंडेशन (एक हात मदतीचा) संस्थेच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि परिसरातील 20 गरजू कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. वन टच फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विठ्ठल फोंडू …

Read More »

गोव्यातील अपघातात बेळगावचे ३ युवक ठार; १ गंभीर जखमी

बेळगाव : गोव्यात प्रवासाला गेलेल्या बेळगावच्या युवकांच्या कारला झालेल्या अपघातात ३ युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना रविवारी सकाळी घडली आहे. गोव्यात फिरायला गेलेल्या युवकांच्या कारला म्हापशाजवळ आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. म्हापशाजवळील कुचेली येथे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक झाली. ही …

Read More »

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे रेडक्रॉस जिल्हा संघटनेकडून स्वागत

बेळगाव : भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी हे जिल्हा रेडक्रॉस संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जिल्हा संघटनेची माहिती देण्याबरोबरच बीम्समधील संघटनेच्या खोल्या अबाधित ठेवण्याची विनंती केली. भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव …

Read More »

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी समन्वय राखा : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सूचना

बेळगाव : नजीकच्या काळात पावसामुळे शेजारील महाराष्ट्रातील जलाशयातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या राज्यातील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवणे आवश्यक आहे. याबाबत बेळगाव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना पर्जन्यमान, जलसाठा आणि इतर बाबींच्या माहितीची सतत देवाणघेवाण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्या आहेत. संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज शनिवारी आयोजित …

Read More »