बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने बेंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील ‘2 ऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021’ क्रीडा महोत्सवामध्ये आज मंगळवारी वेटलिफ्टिंगच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले आहे. या पद्धतीने अक्षताने सलग तिसऱ्यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने पुस्तक दिन कार्यक्रम संपन्न
बेळगाव : बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत वाचनालयाचा सातत्याने लाभ घेणाऱ्या वाचकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर गोविंदराव राऊत, वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर …
Read More »‘जय किसान’ : डीसींसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमिनीची बिगरशेती (एनए) केल्याच्या आरोपावरून बेळगावचे तत्कालीन डीसी अर्थात जिल्हाधिकारी, तहसीलदार, बुडा आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यासह जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मारुती पोलीस ठाण्यांमध्ये काल सोमवारी …
Read More »शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तांना निमंत्रण
बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शतकपूर्ती शिवजयंती आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मिरवणूक उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत केले. शहरात येत्या 2 ते 4 मे या कालावधीत साजरा …
Read More »श्री तुळजा भवानी महिला मंडळाचे उद्घाटन थाटात
बेळगाव : शहरातील बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्या श्री तुळजा भवानी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ काल रविवारी थाटात पार पडला. बापट गल्ली येथे आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आमदार ॲड. बेनके यांच्या हस्ते महिला मंडळाचे …
Read More »बेळगावात महिला सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे स्वागत
बेळगाव : महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेंगळूरहून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे मंगळवारी बेळगावात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बंगळूर मालगुडी आणि रोटरी ई-क्लब ऑफ बंगळूर सखी यांच्यातर्फे 30 दिवसात 30 जिल्ह्यात 3500 किमी अंतराची बाईक रॅली काढण्यात आली आहे. महिला सुरक्षेबाबत जनजागृती …
Read More »शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती
बेळगाव : बेळगावात सेवा बजावुन लोकांची मने जिंकलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती मिळाली आहे. हुबळी येथील हेस्कॉम जागृती दलाच्या एसपी पदी त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. होय, शंकर मारिहाळ यांनी यापूर्वी बेळगावात मार्केट पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर, डीवायएसपी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सध्या ते …
Read More »बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व हसन मुश्रीफ यांची भेट
मुंबई : बेळगांव जिल्ह्यातील मराठी पत्रकारांच्या समस्यांबाबत बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, …
Read More »येळ्ळूर येथे अज्ञाताचा खून करून मृतदेह टाकला
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा खून झाला असावा अशी शंका आहे. खून झालेल्या अवस्थेतील अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्याने येळ्ळूर गावात एकच खळबळ उडाली आहे. कोणीतरी त्याचा खून करून मृतदेह गावात टाकून दिला अशी चर्चा आहे. काल रात्री ही घटना घडल्याचा कयास आहे. …
Read More »रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : रेड क्रॉस संस्था बेळगाव व संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव एकता दिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचविण्याकरिता हातभार लावला. यावेळी अध्यक्षस्थानी मारुती मोरे होते. तसेच व्यासपीठावर डॉक्टर डी. एन. मिसाळे, कर्नल विनोदिनी शर्मा, मुख्याध्यापक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta