Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार

Spread the love

बेळगाव : डॉक्टर आणि सीए हे दोघे पण समाजव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. आज त्यांचा सत्कार प्राईड सहेलीतर्फे श्रद्धा लंच होम येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला फेडरेशन संचालक राजू माळवदे व प्रवीण त्रिवेदी उपस्थित होते.
डॉक्टर समीर पोटे व डॉक्टर अरुंधती पोटे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत यांचे क्लिनिक भारत नगर येथे आहे. समीर पोटे हे इंडियन डेंटल असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्ष झाले आहेत त्यांना बेस्ट प्रेसिडेंट आणि बेस्ट ब्रांच अवॉर्ड मिळाले आहे. त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना सौ. अरुंधती पोटे आणि मोलाची मदत केली आहे त्या पण व्यवसायाने डेंटिस्ट आहेत व त्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात.
सीए सनल शहा यांनी बीकॉम आणि एमकॉम करून 2013 ला सीए झाल्या त्यांनी अनिल नंदोळकरडे ती साडेतीन वर्ष आर्टिकल, सीए सतीश मेहता यांच्याकडे ऑडिट असिस्टंट तर सीए भिडे यांच्याकडे सीए म्हणून प्रॅक्टिस केली आहे. गेल्या आठ वर्षापासून सेल्फ प्रॅक्टिस करत आहेत.
सीए योगिता शहा यांनी बीकॉम पूर्ण करून आपल्याच बहिणीचा आदर्श समोर ठेवून सीए प्रोफेशन निवडले आहे. सध्या त्या देशपांडे आणि कंपनीकडे पार्टनर आहेत व सध्या सीएस तयारी करत आहेत.
डॉक्टर समीर पोटे यांचा सत्कार श्री. राजू माळवदे व प्रवीण त्रिवेदी यांनी केला.
डॉक्टर अरुंधती पोटे यांचा सत्कार अध्यक्षा आरती शहा यांनी केला.
सनल शहा यांचा सत्कार स्नेहल शहा केला तर योगिता शहा सत्कार रश्मी पाटील यांनी केला.
डॉक्टर समीर पोटे यांनी प्राईड सहेला डेंटल कॅम्पसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सनल शहा यांनी टॅक्स कन्सल्टंटसाठी काही मदत लागली तर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉक्टर डे चे महत्त्व व सीए डे चे महत्व व तो का साजरा केला जातो याची माहिती अध्यक्ष आरती शहा यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले तर प्रास्ताविक स्नेहल शहा यांनी केले तर या कार्यक्रमाला अरुणा शहा, भारती चंद्रगिरी, शितल जाधव, नीता बिडकर, मधु नाईक उपस्थित होत्या
आभार प्रदर्शन जिग्णा शहा यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *