बेळगाव : ’भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची गरज आहे’, असे मत कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. बेळगावातील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईला हलवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी त्यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. ’प्रादेशिक अस्मिता आणि अल्पसंख्याक अधिकारांची गरज असणार्या राज्यांतील …
Read More »निवडणुकीतील यश-अपयशाची माहिती पक्षश्रेष्ठींना देणार : मुख्यमंत्री बोम्माई
विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात 13 किंवा 14 जागा जिंकता आल्या असत्या. जाहीर झालेल्या निकालानुसार पक्षाला दोन ठिकाणी बसला धक्का आहे. परंतु एकूणच परिणाम समाधान कारक आहेत. आगामी काळात पक्षाला आणखीन बळकट बनवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जातील. बेळगाव जिल्ह्यात भाजप उमेदवार अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. …
Read More »भ्याड हल्ल्याबाबत संसदेत आवाज उठवणार : खा. अरविंद सावंत
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत आपण संसदेत आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष …
Read More »सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपा गप्प का! : नाना पटोले
मुंबई : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमाभागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. …
Read More »सीमाभागातील मराठी भाषिकांचा कडकडीत हरताळ; बंद 100 टक्के यशस्वी
बेळगाव : महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी पोलिस संरक्षणात भ्याड हल्ला करून काळे फासण्याचा निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बेळगाव बंदला आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत हरताळ पाळला. तसेच दळवींवरील भ्याड हल्ल्याचा चौकाचौकातील माहिती फलकांच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र …
Read More »बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष …
Read More »बेळगावात कायदामंत्री मधुस्वामी यांच्याविरोधात अभाविपचा रोष
बेळगाव : कायदा आणि संसदीय मंत्री जे. सी. मधुस्वामी यांच्याविरोधात कायद्याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बेळगाव सुवर्णविधानसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मधुस्वामी युके 27 या हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी मधुस्वामी यांच्या विरोधार्थ विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचा आग्रह करत अभाविप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सक्षमीकरणासाठी कार्यक्रम आखण्याचा आग्रह
बेळगाव : भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करत आहे, दलित समाजाच्या प्रगतीची भाजपाला काळजी नाही, असे विधान कर्नाटक प्रदेश समिती काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एफ. एच. जक्कप्पनवर यांनी केले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवे काँग्रेसने दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना केली आहे. …
Read More »येळ्ळूरमध्ये कडकडीत बंद
बेळगाव : सकाळपासून येळ्ळूरमधील सर्व दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये गावातील सर्वांनी सहकार्य केले. काल मेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दिपक दळवी यांच्यावर शाहीफेकचा भ्याड हल्ला झाला त्या कृत्याचा येळ्ळूरवासियांनी जाहीर निषेध केला. यावेळी येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्राम पंचायत …
Read More »ग्रामीण भागात बंद 100 टक्के यशस्वी; बेळगुंदीत साखळी उपोषण
बेळगाव : महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासह काळे फासण्याच्या कृत्याच्या विरोधातील बेळगाव बंदच्या आवाहनानुसार आज मंगळवारी बेळगाव तालुक्यातील गावागावांमध्ये उस्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगुंदी येथे तर साखळी उपोषणाद्वारे निषेध नोंदविला गेला. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ल्याची तीव्र पडसाद तालुक्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta