Tuesday , July 21 2026
Breaking News

संतोषच्या कुटुंबियांना काँग्रेस पक्षाकडून सोळा लाखाची आर्थिक मदत

Spread the love


बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्युच्या प्रकरणाला उधाण आले आहे. याबाबत पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असतानाच आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेते मंडळांनी मयत संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
मृत संतोषच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी कंत्राटदार संतोष यांच्या बडस गावी जाऊन संतोषच्या कुटुंबियांना पक्षाच्या वतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांनीही वैयक्तिकरित्या पाच लाख रुपये सदर कुटुंबाला मदत देऊ केली आहे.
संतोषच्या कुटुंबियांना एकूण सोळा लाखांची आर्थिक मदत आज काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. याआधी संतोषच्या आत्महत्यानंतर लगेच पाटील कुटुंबियांची भेट घेऊन अकरा लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा डी. के. शिवकुमार यांनी केली होती. त्यानंतर लगेच दोन दिवसात त्यांनी संतोषच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना अकरा लाखाची आर्थिक मदत देऊ केली. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पाच वर्षांनंतर पुन्हा ई-केवायसी; बेळगाव जिल्ह्यात 22.44 लाख रेशनकार्डधारकांची पडताळणी

Spread the love  बेळगाव : अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांचा शोध घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *