बेळगाव : पावसाची चाहूल लागताच शेतकरी शेतीच्या मशागतीबरोबर भात पेरणी करत असताना रासायनिक खतंही वापरतात. कारण प्रत्येक शेतकऱ्यांना शेणखत मिळतेच असे नाही. त्यामुळे जमीनीत डिएपी, १९/२६/२६ तसेच इतर गोळी खतं वापरतात. त्यासाठी आधीच नियोजन करुन ठेवण्यासाठी शेतकरी खतं घेऊन ठेवतात. त्यांचा भाव एकदम वाढला वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला. कारण पिकवलेल्या …
Read More »म. ए. युवा समितीच्यावतीने काकती येथे भटक्या समाजातील परिवाराला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
बेळगाव : कोरोनाच्या या दुसऱ्या महामारीने भारत देशात थैमान माजले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच अनेक लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.काकती येथे गेली सहा महिने भटक्या समाजातील एकूण आठ कुटुंबे त्यात एकूण 40 लोक वास्तव्यास आहेत. ते सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रमधून बेळगावात व्यवसायानिमित्त सहकुटुंब …
Read More »भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे रुग्णवाहिका सेवा
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे नवी रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटक प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाडी यांच्याहस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे बेळगावातील विजयनगरातील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी नव्या ऍम्ब्युलन्स सेवेचा प्रारंभ करण्यात आला. रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह राघवेंद्र …
Read More »जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक
बेळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे उदभवू शकणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी लोकांचे रक्षण आणि हंगामी पुनर्वसनासाठी सर्व तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष महांतेश हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.बेळगावात शुक्रवारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, यंदा पर्जन्यमान सामान्य …
Read More »वृद्ध वाॅचमन दाम्पत्याला हेल्प फॉर निडीचा आधार
बेळगाव : अपार्टमेंटमधील लोकांनी कोरोनाच्या संशयामुळे अपार्टमेंटमधून बाहेर काढल्यामुळे असहाय्य बनलेल्या वृद्ध वॉचमन दाम्पत्याला आज हेल्प फाॅर निडी संघटनेने आधार देऊन आजारी वृद्धाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबतची माहिती अशी की, महादेव देवण (वय 70) आणि शांता देवाण (वय 65) हे दोघे वृद्ध पती-पत्नी राधेकृष्ण मार्ग, तिसरा क्रॉस, हिंदवाडी येथील …
Read More »शहापूर मुक्तिधामच्या प्रकल्पासाठी बी.के. मॉडेल मित्र परिवाराची मदत
बेळगाव : शहापूर मुक्तिधाम या ठिकाणी नागरिकांच्या उपयोगासाठी निर्माण झालेली आवश्यकता ओळखून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकार उपेंद्र बाजीकर यांच्या नेतृत्वाखाली बि. के. मॉडेल मित्र परिवाराने आर्थिक मदत देऊ केली. तसेच सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पासाठी खारीचा वाटा …
Read More »कोविड दरम्यान अनावश्यक चर्चा करु नका : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी
बेळगाव : मुख्यमंत्री बदलाविषयी घाईगडबड करीत असलेल्या भाजप नेत्यांना परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अथणी तालुक्यातील विविध ठिकाणी कालव्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या कामकाजाचा शुभारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी पत्रकारांशी बोलत होते. सध्याच्या काळात कोविडची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आशा वेळी व्यर्थ चर्चा करण्यात अर्थ नाही …
Read More »३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्सचे ‘बिम्स’ला हस्तांतरण
बेळगाव : बेळगावात ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी ३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स दान केले आहेत. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गुरुवारी ते ‘बिम्स‘ला हस्तांतरित करण्यात आले. याचवेळी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स महानगरपालिका आणि जनसेवा केंद्रांना देण्यात आले.बेळगावात कोरोना रुग्णांच्या उपचारांत ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ती …
Read More »म. ए. युवा समितीच्यावतीने विविध संघटनांच्या कोविड योद्ध्याना पीपीई किट भेट
बेळगाव : कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमध्ये बेळगावमधील विविध संघटना प्रशासनाची कोणतीही मदत नसताना उल्लेखनीय कार्य करत आहेत, लोकांचे जीव वाचवायचे असोत किंवा मृत रुग्णांचा सन्मानाने अंत्यविधी असो सर्व कोरोना योद्धे दिवसरात्र झटत आहेत. अश्याच कोविड योद्ध्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पीपीई किट देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे सचिन चव्हाण, …
Read More »पिग्मी कलेक्टरनाही आर्थिक मदत करा: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
निवेदन देताना बेळगाव- कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे कर्नाटक सरकारने संकटात सापडलेल्या गरीब व श्रमिकांना 1250 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमध्ये पिग्मी कलेक्टर्सचा समावेश नाही. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अर्थिक संस्थांची पिग्मी कलेक्शन ही बंद आहे. पिग्मी कलेक्टर्सना त्यांच्या कलेक्शनवरच संस्थाकडून कमिशन दिले जाते पण कलेक्शन्स …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta