बेळगाव : रोटरी परिवार, बेळगाव असोसिएशन साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्यावतीने बेळगावमध्ये रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते एक या वेळेत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित केले गेले आहे. सदर शिबिर विजया ऑर्थो आणि ट्रामा सेंटर अयोध्या नगर येथे पार पडणार आहे.
या मोफत कृत्रिम अवयव शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रोटरी क्लब आणि इतर संस्थांच्या सक्रीय सहभागातून शिबिराचे आयोजन करण्यासाठी बेळगावातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव रोटरी क्लब ऑफ साऊथ, रोटरी क्लब ऑफ बेळगाव मीड टाऊन, रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तर, रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण, रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा अपंग कार्यालय यासह अनेक संस्थांच्या सहकार्याने सदर शिबिर आयोजित केले गेले आहे.
