कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी कोल्हापूर शहरातील शाहुपूरी भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने- सामने आले. याची जोरदार चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिनोळी येथे रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा उपक्रम राबविला आहे. चंदगडवासीयांची होणारी गैरसोय थांबावी व नेहमी उपलब्ध व्हावी यांसाठी सर्व सोयी नियुक्त अशी अत्याधुनिक अम्ब्युलन्स 24×7 तास रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी प्रभाकर दादा खांडेकर …
Read More »पूरग्रस्तांना राष्ट्रीय काँग्रेस चंदगडचा मदतीचा हात…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी तालुक्यातील दाटे, बुझवडे, तळगुळी, कानडी, कानूर, बामनकेवाडी गावाचा दौरा केला. घुल्लेवाडी- निटूर दरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला सुनीता पांडुरंग कंग्राळकर यांच्या घरी …
Read More »नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथे पूर परिस्थिती पाहणी प्रसंगी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथील …
Read More »जिगरबाज हर्षदमुळे महापुरातही नेसरी परिसरात विजपुरठा सुरळीत : उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महापुराच्या या नैसर्गिक आपत्तीत महावितरणने अहोरात्र काम केले आहे. नेसरी महावितरणचा कर्मचारी हर्षद विजय सुदर्शने याने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन नेसरी परिसरातील १२ गावांचा विजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे जिगरबाज हर्षदसह नेसरी महावितरणचे कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचे मनोगत गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश …
Read More »वाह रें पठ्या ….. पुरावर स्वार होऊन केला १३ गावांचा विजपुरवठा सुरळीत
नेसरी येथील हर्षची कामगिरी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. यावेळी तर घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. पण नेसरी ता. गडहिंग्लज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचे ठायी तत्पर…विजवितरण म्हणत महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत …
Read More »‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’
कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »पुरातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडले, नागरदळे व तळगुळी गावावर शोककळा
तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : दि. २३ रोजी ढोलगरवाडी व घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक युवक व एक महिला वाहून गेली होती. या दोघांचाही दोन दिवस शोध लागू न शकल्याने चिंता वाढली होती. पण आज तिसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह सापडल्याने शोध मोहीम संपली. या …
Read More »अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्याला पूराचा विळखा…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घात-पात घडून येत आहेत.कोवाड, जांबरे, काणूर, पाटणे फाटा, अडकुर या भागात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पूरजण्य परिस्थिती पहायला मिळाली. धरण, बंधारे, …
Read More »अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. माळी ते खळणेकरवाडी रस्त्यावर डोंगरातून येणारा सुकाहळ्ळा येथे अतिवृष्टीमुळे शेतातील ओढ्यामधून जोरदार पानीप्रवाह वाहल्याने तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हा ओढा कमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta