Sunday , September 20 2026
Breaking News

चंदगड

मुसळधार पावसामुळे कानूर बुद्रुक येथे घरांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या …

Read More »

शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार

महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …

Read More »

नागरदळे येथील एकनाथ हदगल यांना मुंबई रत्न पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड -१९ या जागतिक महामारीमध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन मुंबई येथे *“मुंबई रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चंदगड तालुक्यातील नागरदळेच्या या एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद …

Read More »

दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने उभा केला विद्यार्थांसाठी ऑनलाईन सेतू

काजिर्णे धनगरवाड्यातील मुलांसाठी मोबाईल रिचार्जची भेट तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘धनगरवाडा ‘ या चित्रपटामुळे काजिर्णे धनगरवाडा संपूर्ण महाराष्ट्राला समजला. आज सुध्दा येथील मुलांना शिक्षणासाठी पायवाटेने चिखलातून दहा किलोमीटर पायी चालत चंदगडला यावे लागते. लॉकडाऊनमुळे येथील लोकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दिड दोन वर्ष शाळा बंद आहेत. या शैक्षणिक …

Read More »

मांडेदुर्ग येथे कृषीकन्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी येथीलमहात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या माया महादेव पाटील (रा. मांडेदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी सप्ताह साजरा झाला.ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये माती परीक्षण, कलम पद्धत, बागायती …

Read More »

कालकुंद्रीच्या विलास पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी निवड

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील विलास बाळाराम पाटील यांची कोकण विभागाच्या आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. विलास पाटील यांच्या विभागीय आयुक्त म्हणून चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. कालकुंद्री येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत त्यांचे …

Read More »

चंदगड तालुका काँग्रेसकडून इंधन व महागाई विरोधात आंदोलन…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्य तेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर सर्वत्र आंदोलन होत आहेत. आज चंदगड तालुक्यामधे चंदगड तालुका युवक काँग्रेसकडून …

Read More »

नूतन जिल्हाधिकार्‍यांनी स्विकारला पदभार

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. श्री. रेखावार यांनी ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2013 या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2014मध्ये …

Read More »

पालकमंत्री बंटी पाटील यांच्याहस्ते उपसभापती इंदुताई नाईक यांचा सत्कार

कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ. इंदुताई नाईक यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, रामदास पाटील, प्रशांत देसाई, उत्तम नाईक, नागराज जाधव, शिवाजी सावंत, विक्रांत नार्वेकर, सिधगोंडा पाटील, पिंटू तोडकर, मारुती …

Read More »

सेतू अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी : प्राचार्य आर. आय. पाटील

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : “कोविड-१९च्या महामारीमुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यासाठी प्रशासकिय स्तरावरून सेतू अभ्यासक्रमासारखे प्रभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेतु अभ्यासाचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना क्रियाशील बनवणे आहे, ” असे प्रतिपादन प्राचार्य आर. आय. पाटील यांनी केले. ते चंदगड तालुका मराठी …

Read More »