राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवारांकडे तक्रार मुंबई : राज्यसभेतील सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला. या पराभवानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर हल्लाबोल केला. अपक्ष आमदारांनी शब्द फिरवल्यानं शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याचं म्हणत राऊतांनी घोडेबाजाराचा आरोप केला. राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे …
Read More »सदाभाऊ खोत यांचा विधान परिषदेचा अर्ज मागे!
मुंबई : विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी 5 मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपचे 5 अधिकृत उमेदवार …
Read More »सांगलीत पानपट्टी चालवणार्याच्या मुलीला खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक!
सांगली : सांगलीत पानपट्टी चालवणार्याच्या मुलीने खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. वेटलिफ्टिंग खेळात काजोल महादेव सरगर हिने 40 किलोखालील वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. खेलो इंडिया नंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. काजोल सरगर ही एका सामान्य कुटुंबातील …
Read More »धनंजय महाडिकांचा कोल्हापुरात पोहोचण्यापू्र्वीच बंटी पाटलांना अप्रत्यक्ष इशारा
कोल्हापूर : तब्बल आठ वर्षांनी विजयाची चव चाखलेल्या नुतन खासदार धनंजय महाडिक यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोल्हापुरात करण्यात आली आहे. त्यांची मिरवणूक अंबाबाई मंदिरात येऊन संपणार आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच कराडमध्येच धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे पालकमत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा …
Read More »’आमच्या हातात दोन दिवसांसाठी ईडी द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपने विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ’राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतेय हे …
Read More »राज्यसभेचं विजयी सेलिब्रेशन, फडणवीसांची ललकार, आता माघार नाही तर स्वबळावर 2024 जिंकायचं!
मुंबई : आताची छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. पण येणार्या काळातील महानगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. 2024 ची लोकसभा आणि विधान सभा एकहाती भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि राज्यात बहुमताचं सरकार आणेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाविकास …
Read More »घोडेबाजारात विकले गेलेल्यांची यादी आमच्याकडे, संजय राऊतांचा अपक्षांना इशारा
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या दगाबाजी करणार्या आमदरांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद …
Read More »भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी …
Read More »अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती
पुणे : सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (10 जून) नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 …
Read More »आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात
आजरा : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलीसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद उर्फ बाबा खान (वय 54, रा. योगायोग नगर, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta