Thursday , November 21 2024
Breaking News

महाराष्ट्र

कर्नाटकचा ’पुष्पा’ सांगलीत पकडला! तब्बल 2 कोटी 45 लाखांचे रक्तचंदन जप्त

मिरज (वार्ता) : सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन …

Read More »

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अनिल अवचट यांचे निधन

पुणे (वार्ता) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखक आणि मुक्तागंण व्यसनमुक्तीचे केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दीर्घ आजाराने त्यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी …

Read More »

शबनम बानू गुलाम शब्बिर पठाण यांचा सन्मान

माणगांव (नरेश पाटील) : दि. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अलिबाग येथे माणगांवच्या शबनम बानू गुलाम शब्बिर पठाण यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान निवडणूक डेटा ऑपरेटर म्हणून मतदार यादी उत्कृष्ठरित्या केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला सादर सन्मान डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हाअधिकारी रायगड तसेच डॉ. अनिल …

Read More »

कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्राणांतिक उपोषणास सुरूवात

कोल्हापूर (एस. के. पाटील) : कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी नियमबाह्यपणे कायद्याचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे दिलेल्या पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदांच्या मान्यता तात्काळ रद्द कराव्यात या प्रमुख मागणी प्राणांतिक उपोषण कोल्हापूर येथील विभागीय …

Read More »

लोकनेते कै. दादा साबळे यांचे स्वप्न पूर्ण करणार : प्रशांत साबळे

माणगांव (नरेश पाटील) : वॉर्ड क्र.15 ‘माणगांव विकास आघाडी’ मधून भरघोस मतांनी निवडून आलेले नगरसेवक प्रशांत अशोक साबळे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, माणगाववासीयांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून लोकनेते कै. अशोक दादा साबळे यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार. नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत साबळे हे लोकनेते माजी आमदार कै.अशोक साबळे यांचे कनिष्ट …

Read More »

माझ्या यशात मुस्लिम समाजाचा वाटा मोठा : दिनेश रातवडकर

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव विकास आघाडीतील वॉर्ड क्र.17 चे विजयी उमेदवार दिनेश बाळकृष्ण रातवडकर यांनी दै. वार्ताला दिलेल्या मुलाखतीबाबत बोलताना म्हणाले की, मी 427 मते घेऊन नगरपंचायच्या निवडणुकीत विजय संपादन केला. मात्र या श्रेयात मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा असल्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुढे बोलताना रातवडकर यांनी …

Read More »

श्रीकांत राजाराम पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी निवड

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूरातील चंदगड तालुक्यांमधील निट्टूर गावचे सुपुत्र श्रीकांत निंगोजी राजाराम पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पायधूनी पोलिस स्टेशन, झवेरी बाजार, मुंबई येथे निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यांमधून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निट्टूर ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी या स्टेशनला भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत …

Read More »

कोल्हापूर : १० लाखांची लाच उकळणारे दोन कॉन्स्टेबल जेरबंद, एसीबीची कारवाई

कोल्हापूर : मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव, ता. करवीर) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदार नगर मोरेवाडी, ता. …

Read More »

नाना पटोले यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा : भाजपाची तीव्र निदर्शने

कोल्हापूर (वार्ता) : दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे यशस्वी सक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, नाना पटोले कोण …

Read More »

तिलारीनगर येथे माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या 26 वर्षापूर्वीच्या आठवणी!

चंदगड (वार्ता) : तिलारीनगर ता. चंदगड येथील श्री माऊली विद्यालयात 1996-97मध्ये दहावीत शिकणार्‍या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक डी. एस. सातार्डेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी दीपप्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. एस. आर. पाटील, श्रीमती भातकांडे मॅडम, श्री. पवार यांनी हा …

Read More »