Wednesday , July 24 2024
Breaking News

मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र

Spread the love

कोल्हापूर (जिमाका): जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
निमित्त होतं.. ’करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचं! कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील इयत्ता 10 वी 12 वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ’करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळे अंतर्गत पहिले सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते. यावेळी तज्ज्ञ व्याख्याते अहमदाबादच्या आय.आय.एम. संस्थेचे माजी विद्यार्थी तथा पुण्यातील ’करिअर कॉर्नर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश हुंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनेत्रा महाराज- पाटील, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी झोकून देऊन काम करणं आवश्यक असतं. आपली आवड ओळखून करिअरची निवड करा. त्यासाठी प्रचंड मेहनत करा. जिद्दीने वाटचाल करा. जीवनात यशस्वी होवून आई-वडिलांचे नाव उज्वल करा, अस मूलमंत्र जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिला.
ऋषिकेश हुंबे म्हणाले, करिअर सहजगत्या घडत नाही, प्रचंड मेहनतीनं ते घडवावं लागतं. जीवनात मोठं स्वप्न बघा. सकारात्मक विचार करा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी अंगभूत कौशल्य, क्षमता असते; ती ओळखून त्यानुसार करिअरची निवड करा, जेणेकरुन यश मिळवणं सोपं होईल, असे सांगून श्री हुंबे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात करिअर निर्माण करताना ’हार्डवर्क’ला पर्याय नाही. चांगलं काम करून कामातून ओळख निर्माण करा. तुमची आवड, तुमच्यातील क्षमता आणि सध्याची गरज या बाबींचा अभ्यास करुन त्यानुसार करिअरची निवड करा. इयत्ता दहावी, बारावी मध्ये खूप गुण मिळाले, म्हणजे जीवनात यशस्वी झालो, असे नाही. यासाठी ध्येयनिश्चिती करा, त्यानुसार वाटचाल करा. उच्च शिक्षणाअंतर्गत शाखेची निवड करताना ट्रेंड, फ्रेंड आणि पॅरेन्ट्स म्हणजेच सगळ्यांचा कल, मित्र- मैत्रिणींची सोबत, पालकांचा आग्रह म्हणून करिअर न निवडता अभ्यासपूर्वक करिअरची निवड करा, असे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी करिअर मार्गदर्शन शाळेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगून आभार मानले.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात करिअर कसे निवडावे, स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे, उपलब्ध संधी, प्रवेश प्रक्रिया आदी विषयांवर ऋषिकेश हुंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विशाळगड अतिक्रमणाबाबत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love  राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये कोल्हापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *