Sunday , July 21 2024
Breaking News

तेऊरवाडीतील शशिकांतला हवा एक मदतीचा हात

Spread the love

बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बळीराजा.. अंगावरच्या घामावर शेतात सोनं पिकवून आपली तीन वेळची अन्नाची गरज भागवणरा तो अन त्याच्या खांद्याला खांदा देऊन राबणारे त्याचे सर्जा अन राजा बैल… पण कधी कधी नियती दगा देते अन त्याच्यावर न पेलावणारं अघटित संकट कोसळतं.. काल बेंदूर वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी अन त्याच्या सर्जा राजाचा सण… असंख्य शेतकऱ्यांप्रमाणेच तेऊरवाडी (ता. चंदगड) गावातील शशिकांत मारुती कुंभार हा शेतकरीही आपल्या मित्राच्या बैलांच्या सजवण्यात व्यस्त होता. पण अचानक बैल भूजला अन त्याने काही कळायच्या आत केलेल्या हल्ल्यात शशिकांत मारुती कुंभार (वय ३५) हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ गडहिंग्लजमधील हत्तरकी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जखम गंभीर असल्यामुळे ऑपरेशनची तात्काळ गरज आहे. पण या संकटातही घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे पैसे कोठून आणायचे याचा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिलं आहे. अशा प्रसंगी या कुटुंबाला मदत करणं आपलं कर्तव्यच. काहीही झालं तरी हा भूमिपुत्र शशिकांत कुंभार या जीवघेण्या संकटातून बाहेर आला पाहिजे. यासाठी सर्वांनी पुढे येऊन सढळ हाताने पैशांच्या रुपात मदत करावी ही कळकळीची विनंती. ही मदत गजानन पाटील -9850381072 व पारस पाटील – 9405265201 (phone pay, g pay) या नंबर वरती पाठवण्याची आपणाला विनंती करण्यात येत आहे. गावातील एकता ग्रुपने मदतीला सुरवात केली आहे. यामध्ये विष्णू बुच्चे, नागेश पाटील, दत्तात्रय पाटील, परशराम पाटील, सुनिल पाटील, लक्ष्मण पाटील, एस. के. पाटील आदिनी थोडीफार आर्थिक मदत केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी अनिल धुपदाळे यांची निवड

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व डीबीसी लाईव्ह पोर्टल चॅनेलचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *