Sunday , July 26 2026
Breaking News

जायंट्स सखीच्यावतीने वृक्षारोपण

Spread the love

बेळगाव : पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.
शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेविका रेश्मा प्रविण पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
नगरसेविका रेश्मा पाटील, अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रविण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचा हस्ते आंबा, जांभूळ, गुलमोहर, पेरु, बेलपत्र या वीसहून अधिक मोठ्या झाडांसोबत मंदिरात रोजच्या पूजेसाठी लागणाऱ्या जास्वंदी, मोगरा व इतर फुलझाडांच्या रोपांची सुध्दा लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण करण्यासाठी लागणाऱ्या खड्डयांची खुदाई नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली तर झाडांची रोपे जायंट्स सखीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. रोपलागवडीनंतर त्यांची जोपासना करणे महत्त्वाचे असते आणि ती जबाबदारी प्रविण पाटील यांनी स्वीकारली असून झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची निगा करेन असे सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, सुलक्षणा शिन्नोळकर, माजी अध्यक्षा निता पाटील, शितल पाटील यांनी विशेष योगदान दिले.
यावेळी नम्रता महागांवकर, विद्या सरनोबत, अर्पणा पाटील, अर्चना पाटील, ज्योती सांगुकर, सुर्वणा काळे, अर्चना कंग्राळकर, वृषाली मोरे, सुलोचना कुट्रे, प्राची होनगेकर, मंजिरी पाटील, वैशाली भातकांडे, दिपा पाटील, रेणू भोसले गौरी गोठीवरेकर उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *