Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र

तानाजी सावंत यांना जिल्हा परिषदेचा गौरवशाली राजर्षी शाहू पुरस्कार घोषीत…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून कर्मचार्‍यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील (ग्रामसेवक तथा शिक्षक वगळून) इतर प्रवर्गातील कर्मचार्‍यांना २००१ पासून राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंधेला सन २०२०-२१ साठीच्या राजर्षी शाहू पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकुण १४ कर्मचार्‍यांना …

Read More »

शिनोळी बु. येथे श्री गणेश दूध डेअरीचे उदघाटन

शिनोळी : शिनोळी बु. (चंदगड) येथे आज राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोकुळ दूध संचलित श्री गणेश दूध संकलन डेअरीचे उदघाटन केदार फौंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नितीन पाटील होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी प्रतिमा पुजन अनिरुद्ध रेडेकर यांनी केले. गोकूळचे सुपरवायझर निवृत्ती …

Read More »

चंदगड येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीचा शुभारंभ संपन्न

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड येथे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चंदगड तालुक्यात वाढत चालला होता. ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत. याचा तात्काळ विचार करून आमदार राजेश पाटील …

Read More »

सरकार मराठ्यांसोबत : मुख्यमंत्री ठाकरे

कोल्हापूर येथे सारथीच्या उपकेंद्राचे उद्‍घाटन कोल्‍हापूर : ‘मराठा सामजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी राज्‍य सरकारची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची मते, विचार, जुळलेले आहेत. त्‍यामुळे संघर्ष करण्‍याची गरज नाही, संवादातून प्रश्‍न सोडवता येतात या भूमिकेतूनच कोल्‍हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू झाले आहे. हे केंद्र मराठा समाजाला दिशा देईल, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री उध्‍दव …

Read More »

चंदगड तालुका काँग्रेस कमिटीकडून केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन…

चंदगड :(ज्ञानेश्वर पाटील) : ओबीसी आरक्षण रद्द व देशभरातील अघोषित आणीबाणी या दोन्ही विषयाविरोधात आज चंदगड तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरकडून तहसीलदार कार्यालय येथे केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तथा सामाजिक न्याय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या देशभरातील अघोषित आणीबाणी विरोधात तसेच …

Read More »

गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचा शिरकाव…

नगरपालिकेने घेण्यात येत आहे विशेष खबरदारी गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लजमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेंग्यूने शिरकाव केलेला आहे. गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. नगरपालिकेने विशेष खबरदारी घेऊन धूर फवारणी, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे घरोघरी जाऊन डेंग्यूपासून …

Read More »

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर चंदगड पोलिसांची कारवाई; एकाला अटक…

कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर झांबरे येथे सापळा रचून चंदगड पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून एकूण एकूण ५ लाख ९५ हजार १६०/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सतिश उर्फ चिमाजी भिमराव आर्दाळकर (वय.३३, अडकुर, ता. चंदगड) याला …

Read More »

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरीही ईडीची छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) छापेमारी सुरु केली आहे. ईडीचे सहा ते सात अधिकारी देशमुख यांच्या वरळीतील सुखदा इमारतीमध्ये असलेल्या घरी कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाल्यानंतर दुसऱ्याच …

Read More »

वटपौर्णिमेचे औचित्यसाधून साहित्य रत्नं परिवारामार्फत वृक्षारोपण

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : साहित्य रत्नं हा वाँट्सअँपच्या माध्यमातून कार्यरत असणारा चंदगड तालुक्यातील साहित्यिकांचा समुह आहे. या समुहाच्या माध्यमातून साहित्य सेवेसोबतचं काही सामाजिक उपक्रम राबवले जातात. म्हणून आज वटपौर्णिमेचे औचित्यसाधून या साहित्यिक समुहामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. कोरोना स्थितीचा अंदाज घेत प्रत्येक साहित्यिकाने व नैसर्गिक हिताचा विचार करणाऱ्या तालुक्यातील …

Read More »

सरकारच्या स्थिरते संदर्भात शरद पवार यांच्या मनात शंका दिसत नाही : संजय राऊत

मुंबई : खासदार शरद पवार यांनी काल दिल्लीतील घरी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली. तिसऱ्या आघाडीबाबत ही बैठक असल्याची चर्चा होती. यातून शिवसेनेला वगळण्यात आल होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या होत्या. आज प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे, देशासह राज्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज खासदार …

Read More »