अहमदनगर : मांजरीला वाचवताना 5 जणांचा विहीरीत बनवलेल्या शोष खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी हा शोषखड्डा बनवण्यात आला होता. यामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या …
Read More »फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची …
Read More »एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या ४ कामगारांचा मृत्यू
गुढीपाडव्याच्या दिवशी विरारमध्ये धक्कादायक घटना मुंबई : विरारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी विरारच्या पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये एसटीपी …
Read More »महाविकास आघाडीचे सर्व 48 जागांचा फॉर्म्युला जाहीर
मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागावाटप …
Read More »अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा बाहेर येणार
नागपूर : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आला आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर …
Read More »शेट्टीहळ्ळीत हत्तींचा उपद्रव : उभ्या पिकाची नासाडी
चंदगड : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर जंगली हत्ती धुमाकूळ घालत असून अन्नासाठी शेतात भटकत असून पिकांची नासधूस करत आहे. रात्रीच्या वेळी या भागातील केळी, नारळ, ऊस यासह इतर पिके नष्ट करीत आहेत. जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ही कर्नाटक आणि महाराष्ट्राची सीमा असल्याने हत्ती …
Read More »शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे, तर आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या …
Read More »छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बुधवारी सकाळी एका कापडाच्या दुकानाला आग लागली. या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातले सात जण या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. छत्रपती संभाजी नगरमधल्या छावणी भागात ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. छत्रपती संभाजीनगरमधल्या …
Read More »रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट प्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू
कोल्हापूर : आयपीएल स्पर्धा सध्या जोशात सुरु आहे. अशात कोल्हापुरात अत्यंत क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमी माणसाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना होता. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद झाला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा सीएसकेचा फॅन असलेल्या एका क्रिकेटप्रेमी रसिकाने केली. त्यानंतर त्यांचं …
Read More »लोकसभेत कुणालाही पाठिंबा नाही, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा; मनोज जरांगे पाटील
जालना : वेळ कमी पडल्याने गावा-गावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आले नाही. आलेले अहवाल अपुरे आहेत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देवून समाजाला हरविण्याचे पाप मी करणार नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठींबा देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta