Friday , November 6 2026
Breaking News

छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

Spread the love

 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बुधवारी सकाळी एका कापडाच्या दुकानाला आग लागली. या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातले सात जण या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. छत्रपती संभाजी नगरमधल्या छावणी भागात ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी या ठिकाणी आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ जण राहात होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते.
छावणी भागातल्या दाणा बाजार गल्लीत जैन मंदिराच्या बाजूला दुकान होतं. या दुकानाला जी आग लागली त्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

हमीदा बेगम – ५० वर्षे, शेख सोहेल- ३५ वर्षे, वसीम शेख- ३० वर्षे, तन्वीर वसीम -२३ वर्षे, रेश्मा शेख -२२ वर्षे, आसिम वसीम शेख- ३ वर्षे, परी वसीम शेख- २ वर्षे अशी या घटनेतील सात मृतांची नावं आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी कसोशीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. या घटनेत अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झाला. किंग स्टाईल टेलर्स या कापड दुकाना आग लागली. या आगीचे लोट वरपर्यंत पसरले आणि या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

Spread the love    लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *